Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पुण्यात ९ हजार हिंदूंच्या उपस्थितीत ‘सनातन गौरव दिंडी’!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 22, 2024
in maharashtra
0
पुण्यात ९ हजार हिंदूंच्या उपस्थितीत ‘सनातन गौरव दिंडी’!
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने ‘सनातन धर्मावर होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी, तसेच सनातन धर्माचा गौरव वाढवण्यासाठी’ रविवारी सायंकाळी पुणे येथे ९ हजारांहून अधिक हिंदूंनी एकत्र येऊन ‘सनातन गौरव दिंडी’ काढली. यात २० हून अधिक विविध संप्रदाय-संघटना सहभागी झाल्या होत्या. पुणे शहरात ठिकठिकाणी रांगोळी काढून अन् दिंडीवर पुष्पवृष्टी करून मान्यवरांच्या हस्ते दिंडीचा सन्मान करण्यात आला.

प्रारंभी पुणे येथील ‘श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरा’चे विश्वस्त श्री. राजेंद्र बलकवडे आणि ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’चे उपाध्यक्ष श्री. सुनील रासने यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन करून भिकारदास मारुति मंदिरापासून (महाराणा प्रताप उद्यानापासून) ‘सनातन गौरव दिंडी’ला भक्तीमय वातावरणात आणि देवतांच्या जयघोष करून प्रारंभ झाला.

या दिंडीमध्ये सनातन संस्थेच्या सद़्गुरु स्वाती खाडये, पूज्य गजानन बळवंत साठे, पूज्य (सौ.) संगिता पाटील आणि पूज्य (सौ.) मनीषा पाठक आदी संतांची वंदनीय उपस्थिती लाभली. तसेच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच’चे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर, ‘महाराष्ट्र गोसेवा’ अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा, ‘श्री संप्रदाय’च्या महिला अध्यक्ष सौ. सुरेखा गायकवाड, श्री. गायकवाड, ‘पतित पावन संघटना’ पुणेचे अध्यक्ष श्री. स्वप्नील नाईक आणि ‘ग्राहक पेठे’चे कार्यकारी संचालक श्री. सुर्यकांत पाठक, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक अन् महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट हे उपस्थित होते.

या दिंडीविषयी बोलतांना सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस म्हणाले की, सनातन संस्था गेल्या २५ वर्षांपासून निस्वार्थपणे सनातन हिंदु धर्माची सेवा करत आहे. सनातन धर्मावर आलेल्या संकटांच्या विरोधात उभे ठाकणे, सनातन धर्मावरील आरोपांचे खंडण करणे, हिंदूंना धर्माचे शिक्षण देऊन धर्माचरण करण्यास उद्युक्त करणे, सर्वांना एकत्र करून धार्मिक एकतेसाठी आणि धर्मरक्षणासाठी सनातन संस्थेने सातत्याने काम केले आहे. आज कोणीही उठतो आणि सनातन धर्माला डेंग्यू-मलेरियाची उपमा देऊन सनातन धर्माच्या निर्मूलनाची भाषा करतो, यासाठी विविध परिषदा भरवल्या जात आहेत. त्याला हिंदूंनी संघटित होऊन योग्य उत्तर देण्याची आवश्यकता आहे. यासाठी सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने हजारो हिंदूंनी एकत्र येऊन ‘सनातन गौरव दिंडी’ काढली आहे.’

देवता आणि संत यांच्या पालख्यांसह ७० हून अधिक पथके सहभागी !

श्रीरामनामाचा जयघोष करत निघालेल्या या दिंडीत महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी माता, श्रीविठ्ठल-रुक्मिणीमाता, श्री भवानीमाता, श्रीखंडोबा-म्हाळसादेवी, संत सोपानदेव, छत्रपती शिवाजी महाराज आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रतिमा असलेल्या अन् फुलांनी सुशोभित केलेल्या पालख्या दिंडीत सहभागी झाल्या होत्या. नऊवारी साडी नेसलेल्या सुवासिनी, हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवणार्या पारंपरिक वेशातील साधक, कार्यकर्ते, तुळशी घेतलेल्या महिला, छत्रपती शिवाजी महाराज, शिवरायांचे मावळे, बाजीप्रभू देशपांडे, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशातील बालके, तसेच ‘रणरागिणी’द्वारे दाखवण्यात आलेली स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके हे दिंडीचे मुख्य आकर्षण होते ! या दिंडीत ७० हून अधिक पथके,२० हून अधिक आध्यात्मिक संस्था, संघटना, संप्रदाय, मंडळे, मंदिरांचे विश्वस्त सहभागी झाले होते. दिंडीच्या मार्गात १२ हून अधिक ठिकाणी धर्मप्रेमी, समाजातील विविध मान्यवर, प्रतिष्ठीत यांच्या हस्ते दिंडीचे स्वागत करण्यात आले, धर्मध्वज पूजन करण्यात आले.

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासमोरील सौ. विमलाबाई गरवारे प्रशाळेच्या मैदानात दिंडीची सांगता झाली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर शेवटी सनातन संस्थेचे पुणे येथील श्री. चैतन्य तागडे यांनी दिंडीत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.

Post Views: 44
Previous Post

सियाचेन ही शौर्य, जिद्द आणि दृढनिश्चयाची राजधानी – राजनाथ सिंह

Next Post

सोलापुरात उमेदवारांचे निवडणूक खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सोलापुरात उमेदवारांचे निवडणूक खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर

सोलापुरात उमेदवारांचे निवडणूक खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर

ताज्या बातम्या

लाईट दुरुस्तीच्या कामावर गेलेल्या मनपा कंत्राटी कामगाराला चौघांनी केली बेदम मारहाण. #public

February 14, 2026

विठ्ठलास आमंत्रण ने मिळवले यश.#viral #public #solapurnews #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला..#mumbai #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला.. #mumbai #viral #पब्लिक #public

February 14, 2026

भविष्यात तरी कलाकारांना सुयोग्य न्याय दिला जाईल का नागरिकांचा सवाल?#viral #public

February 14, 2026

मंठा लोणार रोडवर दोन हायवा वाहनांवर कारवाई.#viral #marathinews #public

February 14, 2026

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त.#vairal #solapurnews #public

February 14, 2026

वसमत मध्ये उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू.#viral

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679825

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697