लोकसभा सार्वत्रिक २०२४ निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक प्रचार कामी केलेल्या खर्चाची लेखांची तपासणी तीन वेळा करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. 43- माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांची खर्च नोंदवही तपासणीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सदर खर्च तपासणी खर्च निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थित करण्यात येणार आहे.
उमेदवाराचे खर्च 26, 30 एप्रिल आणि 04 मे 2024 रोजी तपासण्यात येणार आहे. 43- माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व उमेदवारांच्या लेख्यांची तपासणी स्थानिक निधी लेखापरीक्षा कार्यालय, पंचायत समिती दक्षिण सोलापूर परिसर, सोलापूर येथे सकाळी 10.00 वाजले पासून करण्यात येणार आहे. सदर वेळापत्रकानुसार सर्व उमेदवारांनी आपल्या खर्चाचे लेखे आवश्यक त्या अभिलेख्यांसह तपासणीसाठी स्वत: किंवा प्रधिकृत प्रतिनिधीमार्फत उपलब्ध करावे. सदर तपासणी निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार अनिवार्य असल्याने सर्व उमेदवार किंवा प्राधिकृत प्रतिनिधीने उपस्थित राहावे, असे आवाहन माढा लोकसभा मतदार खंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह यांनी केले आहे.
खर्च तपासणीसाठी उमेदवाराचे खर्चाचे रजिस्टर मूळ प्रत, उमेदवार उमेदवारांच्या प्रतिनिधीच्या स्वाक्षरीनिशी उमेदवारांने प्रचारासाठी काढण्यात आलेल्या सर्व परवानग्या व त्यांची झेरॉक्स प्रत, निवडणूक प्रचारकामी करण्यात आलेली खर्चाच्या मूळ प्रमाणके, उपप्रमाणके तसेच त्यांची झेरॉक्स, निवडणूक कामी उघडण्यात आलेल्या बँक खात्याचे पासबुक, स्क्रोल व त्यांची झेरॉक्स प्रत, उमेदवारास निवडणूक कामी प्राप्त रक्कमा (राजकिय पक्ष, लोक वर्गणी इ.) या बाबत देणगी मंजुरीचे आदेश, जमेचे प्रमाणकांचे मूळ प्रती व झेरॉक्स प्रती, उमेदवारास निर्गमित केलेल्या नोटिशी व त्यांचा खुलासा (असल्यास) इत्यादी माहिती सोबत आणणे आवश्यक आहे.
सदर खर्च तपासणी वेळेस उमेदवार अथवा उमेदवाराचे प्रतिनिधीने न चुकता उपस्थित रहावे. उपस्थित न राहिल्यास उमेदवार विरुध्द लोक प्रतिनिधी अधिनियम 1951 भारतीय दंड संहिता 1860, व भारतीय निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार उचित कार्यवाही करण्यात येईल, असे निर्देश सिंह यांनी दिले आहेत.