सांगोला – सांगोल्यातील आदर्श विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व संस्थेचे संस्थापक वामनराव शिंदे यांच्या ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले व वामनराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थाध्यक्षा कौशल्यादेवी शिंदे, प्रमुख पाहुणे रामभाऊ शिंदे, सचिव निलकंठ शिंदे, सहसचिव विठ्ठलपंत शिंदे, अर्चना राऊत, ताई महांकाळ यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी निलकंठ शिंदे, शिक्षिका भालके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक संतोष कुंभार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

























