Friday, June 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

“जिजामाता सन्मान” पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात

तरुण भारतbyतरुण भारत
March 12, 2026
in editor
0
“जिजामाता सन्मान” पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – क्रीडा क्षेत्रात आपल्या मुला-मुलींना घडविण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या आदर्श मातांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने क्रीडा भारती, पंढरपूर यांच्या वतीने आयोजित “जिजामाता सन्मान पुरस्कार वितरण समारंभ – २०२६” हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.मातृशक्तीचा सन्मान, संस्कारांचा गौरव आणि कर्तृत्वाचा उत्सव या भावनेतून हा सोहळा कर्मयोगी सभागृह, अर्बन बँक, खवा बाजार, पंढरपूर येथे पार पडला.


कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत डगळे (उपविभागीय पोलिस अधिकारी, पंढरपूर), सीमाताई प्रशांत परिचारक (सामाजिक कार्यकर्त्या) व ज्ञानेश्वर म्याकल (प्रांतमंत्री, क्रीडा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सचिन लादे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी क्रीडा भारती ही संस्था राष्ट्रीय पातळीवर कशा प्रकारे कार्यरत आहे, क्रीडा संस्कारातून राष्ट्रनिर्मितीचा संस्थेचा हेतू काय आहे आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून तो कसा राबविला जात आहे याचे सविस्तर विवेचन केले. तसेच जिजामाता सन्मान पुरस्कार देण्यामागील प्रेरणा स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, राजमाता जिजाऊ यांनी जसे छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले तसेच आजच्या काळात अनेक माता आपल्या मुला-मुलींना प्रोत्साहन देऊन त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू बनविण्यासाठी परिश्रम घेत आहेत. अशा मातांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी क्रीडा भारतीच्या वतीने जिजामाता सन्मान पुरस्कार दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
पुरस्काराला उत्तर देताना खातून नौशाद जमादार यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या मुलांच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसाठी कुटुंबाने घेतलेले कष्ट आणि मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत हा सन्मान सर्व मातांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
ज्ञानेश्वर म्याकल यांनी आपल्या भाषणात क्रीडा भारती या संस्थेच्या माध्यमातून देशभरात राबविण्यात येणारे विविध क्रीडा उपक्रम, त्यामागील राष्ट्रीय दृष्टिकोन आणि त्यातून निर्माण झालेली यशस्वी उदाहरणे यांचा उल्लेख केला.क्रीडा क्षेत्रातून शिस्त, संघभावना आणि राष्ट्रभक्तीची जपणूक करण्याचे कार्य क्रीडा भारती करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सीमाताई परिचारक यांनी आपल्या मनोगतात खेळाडू घडविण्यामागे पालक आणि विशेषतः मातांचे असलेले कष्ट, चिकाटी आणि जिद्द यांचे कौतुक केले. पुरस्कारार्थी मातांचे अभिनंदन करत त्यांनी खेळाडूंच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा भारती, पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष सोमनाथ गायकवाड आणि जिल्हा मंत्री रवी ओहोळ यांच्यासह ओंकार कापसे, प्रवीण देशपांडे, बाळकृष्ण डिंगरे, सुनील जगताप, तुकाराम खंदाडे आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास सुधाकर जोशी, योगेश कुलकर्णी, राजेश दंडे रामेश्वर कोरे, रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल वाडीकुरोलीच्या प्राचार्या डॉ. गीतांजली खाडे, कर्मयोगी पब्लिक स्कूल शेळवेचे प्राचार्य दास तसेच क्रीडाप्रेमी, पालक, खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मातृशक्तीचा गौरव करणारा हा सोहळा प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
——————–
जिजामाता सन्मान पुरस्काराने गौरव
यानंतर क्रीडा क्षेत्रात आपल्या मुला-मुलींना घडविणाऱ्या मातांचा जिजामाता सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. या समारंभात सौ. अंजली समाधान आवताडे (मंगळवेढा), सौ.करुणा जनार्दन शिवशरण (घोडेश्वर–माचनुर), सौ.विद्या विनायक सरगुळे (करकंब) आणि खातून नौशाद जमादार (हुलजंती–उमदी) यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
————————
नूतन पदाधिकाऱ्यांचे सत्कार
यावेळी क्रीडा भारती पंढरपूर तालुका मंत्री म्हणून दत्तात्रय शिरसट यांची तसेच पंढरपूर शहर क्रीडा प्रमुख म्हणून सुनेत्रा नागणे यांची निवड जाहीर करून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Post Views: 34
Previous Post

समाजातील संवेदनशीलता हरवत चालली आहे  – जयकुमार शितोळे

Next Post

आदर्श विद्यालयात सावित्रीबाई फुले, वामनराव शिंदे स्मृतिदिन साजरा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
आदर्श विद्यालयात सावित्रीबाई फुले, वामनराव शिंदे स्मृतिदिन साजरा

आदर्श विद्यालयात सावित्रीबाई फुले, वामनराव शिंदे स्मृतिदिन साजरा

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्यासह उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी केले मतदान

जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्यासह उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी केले मतदान

June 18, 2026
स्वैच्छिक रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे यावे : डॉ. जयकर

स्वैच्छिक रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे यावे : डॉ. जयकर

June 18, 2026
शहर व तालुका वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा

शहर व तालुका वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा

June 18, 2026
प्रशाला क्र. १ कॅम्प येथे प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

प्रशाला क्र. १ कॅम्प येथे प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

June 18, 2026
दि प्रोग्रेसिव्ह हायस्कूल येथे प्रवेशोत्सव उत्सहात साजरा

दि प्रोग्रेसिव्ह हायस्कूल येथे प्रवेशोत्सव उत्सहात साजरा

June 18, 2026
सोलापूर जिल्ह्यातील शरद भोसले पुरस्काराने सन्मानित

सोलापूर जिल्ह्यातील शरद भोसले पुरस्काराने सन्मानित

June 18, 2026
बीपीएमएस पोर्टलवरून टीडीआर प्रमाणपत्रांचे वितरण

बीपीएमएस पोर्टलवरून टीडीआर प्रमाणपत्रांचे वितरण

June 18, 2026
सोलापूरचे चित्रकार डॉ. डग्लस जॉन, रामचंद्र खरटमल यांचा अयोध्यानगरीत कलाविष्कार

सोलापूरचे चित्रकार डॉ. डग्लस जॉन, रामचंद्र खरटमल यांचा अयोध्यानगरीत कलाविष्कार

June 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0919891

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697