‘डंकी ‘ चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. यात शाहरुख खानची प्रमुख भूमिका आहे. या सिनेमाने मात्र अभिनेत्याची निराशा केल्याचे दिसते.
शाहरुख खानच्या ‘डंकी ‘ आणि प्रभासच्या ‘सालार’ या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर या वर्षातील सर्वात मोठा संघर्ष पाहायला मिळणार म्हणून त्यांचे चाहते फार उत्सुक होते. राजकुमार हिरानी यांचा चित्रपट २१ डिसेंबर प्रदर्शित झाला, तर आज २२ डिसेंबरला प्रशांत नीलचा सालार देखील थिएटरमध्ये दाखल झाला आहे. ‘सालार’च्या रिलीजचा ‘डंकी ‘च्या बिझनेसवर किती परिणाम होतो हे आज नंतर कळेल, पण त्याआधी ‘डंकी ‘ची ओपनिंगच्या दिवशी काय अवस्था आहे हे जाणून घ्या.
Sacnilk च्या प्राथमिक माहितीनुसार, शाहरुख खानच्या डंकीने पहिल्या दिवशी फक्त ३० कोटींची ओपनिंग घेतली आहे. शाहरुखची या वर्षातील ही सर्वात कमी ओपनिंग आहे. शाहरुखचा ‘डंकी ‘ पहिल्याच दिवशी विक्रम करेल असे वाटत होते, पण ॲडव्हान्स बुकिंगच्या आकड्यावरुन ते शक्य नाही हे जाणवले. दाखवत होते की असे काहीही होणार नाही, कारण ‘डंकी ‘चे ॲडव्हान्स बुकिंग फक्त १५ कोटी रुपयांच्या आसपास होते.
सलमानच्या ‘टायगर ३’च्या मागे ‘डंकी’
‘डंकी ‘कडून चाहते, प्रेक्षक आणि चित्रपट तज्ज्ञांच्या ज्या काही अपेक्षा होत्या, त्या चित्रपटाला पूर्ण करता आल्या नाहीत. या वर्षी रिलीज झालेल्या सलमान खानच्या ‘टायगर ३’पेक्षाही तो मागे पडला आहे. ‘टायगर ३’ ने पहिल्या दिवशी ४४ कोटींचा व्यवसाय केला होता, पण ‘डंकी’ पहिल्या दिवशी केवळ ३० कोटींचाच टप्पा पार करू शकला. याचे बजेट १२० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
शाहरुखला त्याच्याच चित्रपटांचे रेकॉर्ड मोडता आले नाही
जेव्हा ‘झिरो’ वाईटरित्या फ्लॉप झाला तेव्हा शाहरुख जवळपास ४ वर्षे पडद्यापासून दूर राहिला. यानंतर त्याने यावर्षी ‘पठाण’ चित्रपटातून पुनरागमन केले आणि संपूर्ण हिंदी सिनेसृष्टीमध्ये नवे रेकॉर्ड केले. ‘पठाण’ने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली होती. या वर्षी प्रदर्शित झालेल्या SRK च्या दुसऱ्या चित्रपट ‘जवान’ बद्दल बोलायचे झाले तर भारतात त्याचे नेट कलेक्शन ७५ कोटी रुपये होते. या सर्वांच्या तुलनेत ‘डंकी ‘ खूपच मागे पडला आहे.
रात्री चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी झाली होती
गुरुवारी ‘डंकी ‘ रिलीज झाला तेव्हा ॲडव्हान्स बुकिंगमधून १५ कोटी रुपये जमा झाले होते. चित्रपटगृहांच्या बाहेर आणि आतही चाहत्यांचा उत्साह दिसून आला. चित्रपटाच्या गाण्यांवर जनता नाचताना दिसली आणि फटाक्यांची प्रचंड आतषबाजी झाली. संध्याकाळच्या शोमध्ये २६.४८% प्रेक्षक थिएटरमध्ये पोहोचले. तथापि, ही संख्या दिवसभरात २१.७७% पर्यंत घसरली. त्यानंतर २८.९२% प्रेक्षक संध्याकाळी आणि ४२.६२% रात्री थिएटरमध्ये पोहोचले.
‘सालार’ची जोरदार ॲडव्हान्स बुकिंग, विक्रम करणार!
‘डंकी ‘ विरुद्ध ‘सालार’ असा सर्वत्र बोलबाला आहे. २०२३ मधील सर्वात मोठ्या क्लॅशचे काय होईल हे आज कळेल. प्रभासच्या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग ४८.९४ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाची २२,३८,३४६ तिकिटे विकली गेली आहेत. यानुसार ‘सालार’ शुक्रवारी ओपनिंगच्या दिवशी देशभरात १०० कोटींची ओपनिंग घेऊ शकते. ‘डंकी’ कोणताही विक्रम करू शकला नाही, पण ‘सालार’ २०२३ चा सर्वात मोठा चित्रपट आणि सर्वात मोठी ओपनिंगचा विक्रम करेल अशी आहे. याचा अर्थ ‘डंकी ‘साठी अडचणी आणखी वाढू शकतात. सालार’चे ‘डंकी ‘पेक्षा कमी शो आहेत.
‘सालार’चे शो ‘डंकी’च्या तुलनेत कमी आहेत. ‘सालार’ ६ हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. त्याच्या शोची संख्या १२ हजार आहे, तर ‘डंकी ‘ ४ हजार स्क्रीनवर रिलीज झाला असून त्याच्या शोची संख्या १५ हजारांहून अधिक आहे.