शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरू शकते. १ डिसेंबर २०२३ पासून टाटा समूहाची दिग्गज आयटी कंपनी, टाटा कन्स्लटंसी सर्व्हिसेसचे बायबॅक सुरू झाले असून सात दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे तुम्ही पण बायबॅक ऑफरमध्ये शेअर विक्रीचा विचार करत असाल तर करासंबंधीचा नियम जरुर जाणून घ्या.
शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांनी आपले तिमाही निकाल जाहीर केले असून अनेक कंपन्यांनी भागधारकांना अंतरिम लाभांश दिला तर काहींनी बोनस शेअर्स आणि शेअर बायबॅकच्या ऑफरही दिल्या आहेत. जर तुमच्या पोर्टफोलिओमधील कोणत्याही कंपनीने असे केले असेल तर तुम्हाला समजले पाहिजे की हे सर्व पर्याय तुमच्या उत्पन्नाचा भाग आहेत.
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टाटा समूहातील दिग्गज आयटी कंपनी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे TCS आपलेच शेअर्स खरेदी करत आहेत. त्यामुळे जर तुम्ही या बायबॅक ऑफरमध्ये शेअर्सची विक्री करत असाल किंवा केली असेल तरी ही बातमी तुमच्यासाठीच आहे. अनेकदा बाजारातील गुंतवणूकदार विशेषतः सामान्य लोक शेअर बायबॅकवरील कराविषयी संभ्रमात असतात.
शेअर बायबॅकमध्ये गुंतवणूकदारांना कसा व कोणावर कर लागतो, हेच लक्षात येत नाही. शेअर बायबॅकनंतर कर कंपनीला भरावा लागतो की आपल्याला, याविषयी संभ्रम पाहायला मिळते. अनेक जण कंपनीने दिलेले बोनस शेअर बायबॅक ऑफरमध्ये विक्री करतात आणि मग कर भरायचा की नाही याविषयी आपापसातच किंवा CA सोबत चर्चा करतात. कर तज्ज्ञांच्या मते जेव्हा एखादी कंपनी शेअर्स बायबॅक करते तेव्हा त्यावर कर भरावा लागतो मात्र, भागधारकाला कोणताही आयकर भरावा लागत नाही. शेअर बायबॅकवर कसा कर आकारला लागू होतो जाणून घ्या…
शेअर बायबॅकवर आयकर नियम
यापूर्वी बायबॅक ऑफरमध्ये शेअर देणाऱ्यांना आयकर भरावा लागत होता. म्हणजे बायबॅक शेअरची विक्री करणाऱ्या गुंतवणूकदाराला कर द्यावा लागत होता, तर लाभांशावर कंपनीला कर भरणे बंधनकारक होते. पण आता हा नियम बदलला आहे. नव्या नियमानुसार आता बायबॅकवर कंपनी कर जमा करते, तर लाभांशावर करदात्याला कर भरणे भाग आहे.
शेअर बाजाराचा नियम कोणासाठी?
शेअर बाजारातील बायबॅक आणि लाभांशवरील नियम केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठीच नाही तर सर्वांसाठी आहे. परंतु तो आयकरात दाखवायचा कसा हा प्रश्न आहे. तर याचे उत्तर म्हणजे आयकर रिटर्नच्या भांडवली नफा पृष्ठावर बायबॅकचा पर्याय असतो त्यामध्ये तुम्ही ही रक्कम दाखवू शकता. बायबॅकची रक्कम उत्पन्नात समाविष्ट केली नसली तरी तुमचे सर्व व्यवहार आयकर रिटर्नमध्ये दर्शविणे बंधनकारक असते.