सांगोला – माजी नगराध्यक्ष कै.गोविंद जाधव यांचे नातू सोहम भगवान जाधव हे इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने सप्टेंबर २०२५ मध्ये घेतलेल्या चार्टर्ड अकाऊंटट अंतिम परिक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
सोहम जाधव यांचे इ.५ ते १० वी पर्यंतचे शिक्षण न्यु इंग्लिश स्कूल सांगोला, इ.११ व १२ वी पर्यंतचे शिक्षण विद्यामंदिर प्रशाला ज्यू.काॅलेज सांगोला येथे तर पदवीचे शिक्षण गरवारे कॉलेज ऑफ काॅमर्स पुणे येथे पुर्ण झाले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार जिद्द मेहनत व योग्य नियोजनातून हे यश आपणास मिळाले असल्याचे सोहम जाधव यांनी सांगितले. या यशाबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.


























