पंढरपूर – भैरवनाथ शुगर उद्योगाचे चेअरमन अनिलदादा सावंत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी पंढरपूर आणि मंगळवेढा येथील स्थानिक प्रश्ना संदर्भात देखील उपमुख्यमंत्र्यांशी त्यांनी चर्चा केली.
कार्तिकी यात्रे निमित्त येथील विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापुजा करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच पंढरपूर येथे आलेले होते. यावेळी भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिलदादा सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सावंत यांच्या निवासस्थानी स्वागत केले.
यावेळेस महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत तसेच रोजगार व हमी योजना कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले, भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर तसेच माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
















