वेळापूर – येथील श्री क्षेत्र महात्मा फुले गणेशोत्सव मंडळाच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन माजी जि. प. सदस्य सतीशराव माने देशमुख, प.स. सदस्या विमलताई जानकर व जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी सरतापे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्री क्षेत्र महात्मा फुले गणेशोत्सव मंडळाच्या वतीने नूतन जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी सरतापे व पंचायत समिती सदस्या विमलताई जानकर यांचा लक्ष्मी राऊत व अश्विनी भानवसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करत आनेकांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आशिष कांबळे, माजी जि.प. सदस्य सतीशराव माने देशमुख, महादेवभाऊ ताटे, अमरसिंह माने देशमुख, मिलिंद सरतापे, शंकरराव काकुळे, हनुमंतराव साळुंखे, विश्वास वाघे, धनंजय माने देशमुख, मदनसिंह माने देशमुख, ओंकार माने देशमुख, संदीप माने देशमुख, दीपक राऊत, काकासाहेब जाधव, उपसरपंच नानासाहेब मुंगुसकर, अमृतराव माने देशमुख, काशिनाथ आडत, भागवत गायकवाड, शिवाजी मोहिते, अॅड. विठ्ठल मंडले, अमोल मंडलिक, राजकुमार शिंदे, डॉ. धनंजय मेहत्रे, पिनू येडगे, भैय्या कोडग, उमेश भानवसे, अजीत साठे, चंद्रकांत बनकर, चंद्रकांत आडत, इसाक पठाण, अमोल साठे, महेश साठे, मल्हारी बनकर, बापू आडत, खंडू आडत, गोपाळ शिरसागर, ओंकार आडत, ओंकार खराडे, जवान माने देशमुख, अॅड. दत्तात्रय राऊत, कैलास सुरवसे, डॉ. महेश हजारे, डॉ. धनंजय मेहत्रे, तुकाराम राऊत, मंडळाचे अध्यक्ष राजकुमार पोरे, नागेश क्षीरसागर, विलास राऊत, बापू भानवसे ,सोमनाथ चांडोले, शंकर राऊत, आर.बी. पवार, आनंद वाघे, स्वप्निल सरवदे, नागेश मोहिते, माऊली राऊत , सीमा खाडे, प्रियंका आडत, अजित बनकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन श्री क्षेत्र महात्मा फुले गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.























