अक्कलकोट – आपल्या अपार लिलांनी द्वापार युगात जसे महीपती भगवान श्रीकृष्णांनी आपली महीमा पृथ्वीतालावर अधोरेखीत केली आहे तशीच महीमा वर्तमान कलियुगात श्री स्वामी समर्थांची प्रचलीत झाली व होत आहे, म्हणून ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज हे कलियुगातील महीपती असल्याचे मनोगत भारतीय प्रशासन सेवेतील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आय.ए.एस. संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री.वटवक्ष स्वामी महाराज मंदीर येथे भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समिताच्या वतीने समितीचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांनी आय.ए.एस.संजीव जयस्वाल यांचा
श्री.स्वामी समर्थाचे कृपावस्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी आय.ए.एस.संजीव जयस्वाल बोलत होते. पुढे बोलताना आय.ए.एस. संजीव जयस्वाल यांनी श्री.स्वामी समर्थानी आपल्या अवतार कार्यात अनेक चमत्कार केले आहेत. दीन दुबळ्यांचे असाध्य आजार बरे केले आहेत. श्री. स्वामी समर्थांना आपला भक्त मोह माया पासून परावृत्त राहून त्याग व समर्पण करणारा भक्त प्रिय आहे. अशा अनेक भाविकांना स्वामींची प्रचिती आली व येत आहे, त्यामुळे श्री स्वामी समर्थांच्या भक्त गणांची संख्या वाढत आहे.
सर्व स्वामी भक्तांना उत्तम सोई सुविधा देता याव्यात सर्वांना सुलभपणे स्वामी दर्शनाचा लाभ घेता यावा याकरीता मंदीर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे व मंदीर समिती पदाधिकारी यांनी समर्पण भावनेने श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मध्ये सेवा देत असल्याचे पाहून आपण प्रभावित झालो असल्याचे मनोगतही व्यक्त करुन आपला येथे विशेष आदरतिथ्य करण्यात आल्याबद्दल महेश इंगळे व मंदीर समितीचे आभार मानले.
यावेळी अक्कलकोटचे मंडल अधिकारी जुबेर नदाफ, पुरवठा निरीक्षण अधिकारी विराज वासेकर, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – आय.ए.एस.संजीव जयस्वाल यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
























