सांगोला – चोपडी (ता.सांगोला) येथील वनविभागात झाडे जगवा उपक्रमाला सुरूवात करण्यात आली असून वनविभागातील १८ हजार झाडांना टँकरच्या साहाय्याने पाणी देण्यास सुरुवात केली असून पावसाळा सुरु होईपर्यंत काम चालू राहणार आहे. आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नामुळे तसेच शेतकरी, युवक, वनविभागाचे कर्मचारी यांच्या कष्टातून निसर्ग फुलणार आहे.
चोपडी ग्रामस्थांनी या झाडांना वाचवण्यासाठी थेट सांगोला वनपरीक्षेत्र कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. त्यावेळी आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी यासाठी आर्थिक तरतूद करण्याचा शब्द दिला होता. प्रगतशील शेतकरी भागवत बाबर यांनी संपूर्ण पाण्याची सोय केली आहे. माजी सैनिक सुनील बाबर यांनी नारळ फोडून झाडे जगवा मोहिमेचा शुभारंभ केला.
यावेळी सेवानिवृत्त सुभेदार अमोल बाबर, दिलीप बाबर, एम.एस.बाबर, विनायक बाबर, विकास बाबर, वनपाल नरळे उपस्थित होते. तीव्र उन्हामुळे सुकलेल्या झाडांना यामुळे नवसंजीवनी मिळणार असून सुस्थितीत असणाऱ्या झाडांची वाढ होण्यासाठी याची मदत होणार आहे.
























