सोलापूर – श्राविका संस्थानगर येथील उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत थाटामाटात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या विश्वस्त अंजली शहा तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.सुहासिनी शहा, पी. एस. व्ही. ट्रस्टचे विश्वस्त करण शहा, देवई शहा, प्रिसिजन फाउंडेशन चे समन्वयक माधव देशपांडे,प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, मार्गदर्शिका दीप्ती शहा, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ, इंग्लिश मीडियम जुनियर कॉलेजचे प्राचार्य विलास लेंगरे, आयटीआयचे प्राचार्य पाटील सर, ग्रंथपाल रत्नपारखे सर, चतुरबाई विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राखी देशमाने, इंग्लिश मिडीयमच्या, पी.एस. इंग्लिश मीडियम मुख्याध्यापिका स्वाती कांबळे यांची उपस्थिती होती. आरंभी विद्येची आराध्य देवता सरस्वती माता, प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व संस्थेच्या संस्थापिका पद्मश्री पंडिता सुमतिबाई शहा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रशालेच्या संगीत शिक्षिका सोनाली उंडे, पल्लवी खांडवे, तबलावादक शिक्षक वृषभ सोनटक्के व इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनींनी सुमधुर स्वागतगीताद्वारे मान्यवरांचे स्वागत केले. सोनल आळंद यांनी कार्यक्रमासाठी लाभलेल्या अष्टपैलू प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला.प्रशालेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, बुके व संस्थेच्या संस्थापिका पंडिता राजुलमती माताजींचे चरित्र जीवनज्योत या पुस्तकाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. प्रशालेचे कलाशिक्षक प्रवीण कंदले यांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेले श्री व सौ. सुहासिनी यतीन शहा यांचे चित्र डॉ.सुहासिनी शहा यांना भेट दिले. मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे यांनी आपल्या प्रास्ताविकाद्वारे आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा व पद्मश्री पंडिता सुमतिभून , राजुलमती माताजी, रतनचंदजी शहा, सुभाषचंद्र शहा, प्रथम मुख्याध्यापिका विद्युल्लता शहा, हर्षवर्धनजी शहा यांच्या आठवणींना उजाळा देऊन संस्थेच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा दिला. स्पर्धेच्या युगात मराठी शाळा टिकविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले व प्रिसिजन फाउंडेशन च्या वतीने मराठी शाळांसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची त्यांनी स्तुती केली.
यावेळी मागील सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी ते दहावीतील गुणानुक्रमे प्रथम, व द्वितीय क्रमांक संपादन करून स्वतःचे व प्रशालेचे नावलौकिक वाढविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व राष्ट्रीय, राज्य, जिल्हा पातळीवरील विविध क्रीडा स्पर्धेत शाळेचे प्रतिनिधित्व करून यश
संपादन करणारे खेळाडू अशा 56 विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. प्रशालेच्या मागील वर्षीच्या कामगिरीचा आलेख म्हणजेच वार्षिक अहवालाचे वाचन व उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित व पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांनी केले.इयत्ता सातवी क तील विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका सोनाली उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.सुहासिनी शहा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावीत, ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी असा सल्ला यावेळी विद्यार्थ्यांना दिला. पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे आपल्या पाल्यावर लादू नयेत अशी अपेक्षाही त्यांनी पालकांकडून व्यक्त केली. कार्यक्रमाचे नेटके नियोजन पाहून त्यांनी मुक्तकंठाने स्तुती केली व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा घेण्याचा सल्लाही दिला. बदल ही सातत्याने होणारी प्रक्रिया असल्याने प्रत्येकाने त्याला सामोरे गेले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. प्रिसिजन फाउंडेशनचे समन्वयक देशपांडे यांनीही आपल्या मनोगताद्वारे यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व इतर विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशालेतील इयत्ता पाचवी अ, सहावी अ व इयत्ता सातवी क या वर्गांना आदर्श वर्ग म्हणून तर 100% उपस्थितीबद्दल इयत्ता दहावी ब या वर्गाचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. इयत्ता नववी ड तील विद्यार्थिनी गायत्री निकते,नववी अ तील श्रुतिका सुरवसे, सातवी क तील प्रतीक काकडे व सहावी अ तील जान्हवी सिद्धगणेश दहावी क तील श्रुती कदम,सहावी ब तील ज्ञानेश्वरी शिंदे, आठवी ब तील भक्ती लामकाने,सातवी ब तील ऋतुजा हिप्परकर हे गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी खोत व अनंत बळळे यांनी तर आभार राजश्री आगरखेड यांनी मानले. बक्षिसांचे यादी वाचन प्रीती वऱ्हाडे व कविता उपाध्ये यांनी केले.कार्यक्रम स्थळी केतकी सोनटक्के व सरस्वती शेटे यांनी रेखाटलेली रांगोळी सर्वांचे आकर्षण ठरली. प्रशालेतील तंत्रस्नेही शिक्षक अभिजीत पाटील व वृषभ सोनटक्के यांनी केलेल्या पीपीटीचेही मान्यवरांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग, अनुप कस्तुरे , सुहास छंचुरे, अभिनंदन उपाध्ये प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आर. एस. पी. स्काऊट गाईड विद्यार्थी विद्यार्थिनीनी परिश्रम घेतले.


















