मुंबई, 30 जून (हिं.स.) छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी तिथीनुसार करण्याची घोषणा रायगड येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आली आहे. शासनाकडून रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करण्याचे ठरवले असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे.
ही बाब केवळ छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यापुरतीच मर्यादित आहे. किल्ले रायगड येथे असलेल्या शिलालेखावर राज्याभिषेकाची तारीख नसून तिथी ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी असा उल्लेख करण्यात आलेला आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत निवेदनातून दिली.
याबाबत विधानसभा सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता.