धारशिव – शनिवार दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने पोलीस स्टेशन बेंबळी येथे बेंबळी गावातील शालेय विद्यार्थिनींना व महिलांना छेडछाड करणाऱ्या गावगुंड व समाजकंटकावर कारवाई करणे बाबत निवेदन देण्यात आले.
हे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पाटील साहेब पोलीस स्टेशन बेंबळी यांना देण्यात आले. निवेदनात असे नमूद करण्यात आले होते की,बेंबळी गावातील जिजामाता कन्या प्रशाला या शाळेमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींना गावातील काही समाजकंटक व गावगुंड तरुण छेडछाड करून व अश्लील हावभाव करून त्रास देण्याच्या उद्देशाने छेडखानी करत आहेत. अनेक विद्यार्थिनी भीतीपोटी व बदनामी पोटी पोलिसात तक्रार करत नाहीत. तसेच बेंबळी गावातील महिलांना पण त्रास देणे छेड काढणे अश्लील हावभाव व इशारे करणे यामुळे बेंबळी गावात भीतीदायक वातावरण निर्माण झालेले आहे. या सर्व गोष्टीला पोलीस प्रशासन बऱ्याच अंशी कारणीभूत आहे अशी समस्त गावकऱ्यांची मानसिकता झालेली आहे.
तरी पोलीस प्रशासनाने तात्काळ अशा गावगुंड समाजकंटकाविरुद्ध तात्काळ कठोरात कठोर कार्यवाही करून संबंधितांना जेरबंद करण्यात यावे अन्यथा शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्यावतीने पोलीस प्रशासनाच्या विरोधात मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवचे तालुका उपाध्यक्ष श्री बबलू भोईटे सचिव श्री बालाजी पवार कार्याध्यक्ष श्री सचिन खापरे धाराशिव शहर उपाध्यक्ष श्री आकाश भोसले शहर सचिव श्री भैरवनाथ रणखांब चिखली विभागप्रमुख श्री विकास जाधव श्री अक्षय घाडगे, ज्ञानेश्वर मते,आदित्य माने,शुभम शिडुळे, अविनाश मोटे, विष्णू निकम, अविनाश खापरे, सुदर्शन इंगळे, औंदुबर खापरे, सतिश लगड, अजित माने, वैभव शिडुळे, सुनिल दाणे, सुधीर डोलारे, मारुती कसपटे, अभय ढोणे, अजय रेडेकर, शुभम भोसले, रोहित पटाडे,आदित्य कुंभार, विशाल शहा आकाश शेळके केदार पवार आदि समितीचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.