धर्मवीर आनंद दिघे यांच्या ज्येष्ठ भगिनी अरुणाताई गडकरी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कौशल्य हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून अरुणाताईंची तब्येत बरी नसल्याचे समजल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
यावेळी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संजय ओक यांच्याकडून त्यांनी त्यांच्या तब्येत आणि सुरू असलेले औषधोपचार यांच्याबाबत माहिती घेतली. तसेच अरुणाताईंवर शक्य ते सारे उपचार करावेत आणि त्या लवकरात लवकर पूर्ण बऱ्या होतील यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती डॉक्टराना केली.





















