तभा वृत्तसेवा
टेंभुर्णी /प्रतिनिधी
विष्णु मगर
जाफराबाद तालुक्यातील शेतकर्यांनी सन २०२३-२४ मधील खरीप हंगामात सोयाबीन पिकाचा विमा काढलेला असताना काढणीच्या वेळी अतिवृष्टी मूळे सोयाबीन पिकाची नासाडी झालेली होती.तर बऱ्याच शेतकऱ्यांनी कंपनीच्या निर्देशानुसार ७२ तासाच्या आत कंपनीच्या साईट वर तक्रार नोंदविली आहे.असे असतांना मात्र विमा भरलेल्या शेतकऱ्यांपैकी पंधरा ते वीस टक्के शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळाली असून बाकी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहे.
यामध्ये काही ठिकाणी तर वेगळाच बाब निदर्शनास आलेली आहे. निवेदनात नमूद केल्या प्रमाणे एकाच गावातील दोन्ही गट क्रं.क्रमाने जवळच असुन दोघानीही नुकसान झाल्याची तक्रार, स्थळ पंचनामा एकाच वेळी झालेला असताना, एका शेतकर्याला विमा भेटतो, व दुसरा शेतकरी मात्र अजूनही प्रतीक्षेत आहे. हा दूजाभाव कश्यामुळे होत आहे,हे कोढ न उलगडण्यापलिकड असल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखविले आहे. किंवा एकाला तुपाशी, दुसरा उपाशी अशीच म्हणायची वेळ शेतकऱ्यांना आली आहे. तालुक्यातील कृषी अधिकारी यांनी या गोष्टीवर लक्ष घालण्याऐवजी विमा कंपनीचे पाठराखण करत असल्यामुळे बरेच शेतकरी तालुक्यातील कृषी कार्यालयाकडे देखील संशयाच्या सुईने बघत आहे.