
सोलापूर – आप सोलापूर शहर च्या वतीने महागाई, इंधनदरवाढ आणि वाढत्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर “मोफत बैलगाडी प्रवास” असे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. आपचे सोलापूर शहर अध्यक्ष निलेश संगेपाग यांच्या नेतृत्वात सर्वसामान्य नागरिकांवर वाढत्या इंधनदरांचा आणि महागाईचा होत असलेला परिणाम अधोरेखित करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
आंदोलनादरम्यान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बैलगाडीतून प्रवास करत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात घोषणाबाजी केली. तसेच विविध आशयघन फलक हातात घेऊन सरकारकडे सर्वसामान्यांचा आवाज पोहचवण्याचा प्रयत्न केला .
यावेळी शहर अध्यक्ष निलेश संगेपाग यांनी आधीच आपल्या सरकारने प्रति्बंधत्मक उपाययोजना करण्यास विलंब केला देशहिताच्या ऐवजी निवडणुकांना प्राधान्य दिले ज्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आता आणखीन विलंब न करता देशहितासाठी मोदीजींनी त्यांची 56 इंच ची छाती ट्रम्प यांना दाखवून द्यावं आणि देशहितासाठी कठोर ठाम भूमिका घ्यावी आजवर अनेक उद्योगपतींना सरकारने दिलासा दिलेला आहे आता फक्त जनतेलाचा त्याग करायला भाग पाडू नका तर उद्योगपतींना आणि नेत्यांना हि त्याग करायला भाग पाडा असे मत व्यक्त केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष एम पाटील, माजी शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे, मल्लिकार्जुन पिलगेरी, सुचित्रा वाघमारे, रहीम शेख, रॉबर्ट गौडर, बसवराज सारंगमठ, मदणी चाचा, प्रसाद बाबानगरे, आदी उपस्थित होते.




















