भोकरदन / जालना : भोकरदन तालुकाच नव्हे तर संपूर्ण जालना जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व, श्री गजानन महाराज अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक अध्यक्ष, भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव तसेच श्री रामेश्वर संस्थान, रामपूरचे अध्यक्ष स्व. गणेशराव रोकडे साहेब यांच्या उत्तरकार्याप्रसंगी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. विष्णु महाराज सास्ते माऊली यांची भावपूर्ण कीर्तनसेवा आज संपन्न झाली.
कीर्तनात संत तुकाराम महाराजांच्या
“याजसाठी केला होता अट्टाहास । शेवटाचा दिस गोड व्हावा ॥”
या अभंगावर निरूपण करताना महाराजांनी आयुष्य असे जगावे की माणूस गेल्यानंतरही त्याचे नाव कीर्तीरूपाने टिकून राहावे, असे प्रतिपादन केले. स्व. गणेशराव रोकडे साहेबांनी आपल्या समाजोपयोगी कार्यातून, सहकार क्षेत्रातील योगदानातून आणि संस्थात्मक बांधिलकीतून हेच आदर्श जीवन जगल्याचे महाराजांनी सांगितले.
अभंगाच्या दृष्टांतातून महाराजांनी स्व. रोकडे साहेबांच्या बहुआयामी जीवनकार्यावर कीर्तनातून सविस्तर प्रकाश टाकला. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना दिशा मिळाली असून समाजमनात त्यांचे नाव सदैव स्मरणात राहील, असेही त्यांनी नमूद केले.
या कीर्तनसेवेस विविध क्षेत्रांतील मान्यवर, आप्तेष्ट, नातेवाईक तसेच स्व. रोकडे साहेबांवर प्रेम करणारे असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
किर्तनास मृदंगसाथ उमेश महाराज ठोंबरे, गायनसाथ प्रदिप महाराज बनकर,भगवान महाराज गाडेकर,शंकर महाराज साबळे,भागवत महाराज लोखंडे,रुषीकेश महाराज,मोरेश्वर महाराज आदींची लाभली.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


























