Thursday, February 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्पर्धेत टिकण्यासाठी कमी दिवसांत जास्त गाळपाची गरज

तरुण भारतbyतरुण भारत
February 19, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा – तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ चा ३३ वा गळीत हंगाम सांगता समारंभ चेअरमन  शिवानंद यशवंत पाटील यांच्या शुभहस्ते व संचालक राजेंद्र चरणुकाका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने कारखान्याचे संचालक  महादेव सखाराम लुगडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. लता महादेव लुगडे यांच्या शुभहस्ते श्री सत्यनारायण महापूजा पार पडली. हा समारंभ कारखान्याच्या यशस्वी हंगामाचा अभिमान साजरा करणारा व भविष्यातील नियोजनावर प्रकाश टाकणारा ठरला.

या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना चेअरमन  शिवानंद पाटील यांनी साखर कारखानदारीतील स्पर्धात्मक वातावरणाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, “साखर कारखानदारीचे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी यापुढील काळात कमीत कमी दिवसांत जास्तीत जास्त गाळप करणे काळाची गरज आहे. यासाठी संचालक मंडळाने कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याचा ठोस विचार सुरू केला आहे.” कारखान्याची जुनी मशिनरी, तालुक्यातील कारखान्यांची वाढती संख्या व एकरी सरासरी ऊस टनेज कमी झाल्याने यंदा उद्दिष्टाप्रमाणे गाळप करता आले नाही, असेही त्यांनी सांगितले. तरीही व्हा. चेअरमन  तानाजी खरात, संचालक मंडळ, सभासद शेतकरी, ऊस तोडणी-वाहतूक ठेकेदार व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हंगाम यशस्वी झाला. पाटील यांनी कारखान्याच्या संस्थापकांचे योगदान आठवण करून दिले. संस्थापक चेअरमन स्व. मारवाडी वकीलसाहेब, संस्थापक व्हा. चेअरमन स्व. रतनचंद शहा शेठजी व माजी चेअरमन स्व. चरणुकाका पाटील यांनी हा कारखाना शेतकऱ्यांचे ‘मंदिर’ म्हणून नावारूपाला आणला. त्यांच्या विचारांचे पालन घडविताना संचालक मंडळाने डिसेंबर २०२५ अखेर ₹२८५० प्रति मेट्रिक टन ऊसबिल दिले. तोडणी-वाहतूक बिले १५ जानेवारी २०२६ पर्यंत अदा केली. कारखान्याने ३ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करून ३००५६४ क्विंटल साखर उत्पादन केले. गेल्या तीन वर्षांत एफ.आर.पी. पेक्षा जास्त ऊसदर वेळेवर दिले, तर कामगारांचे पगार प्रत्येक महिन्याच्या दहाव्या तारखेपूर्वी अदा केले. सभासद शेतकऱ्यांचा विश्वासच हंगाम यशस्वी करण्याचे मुख्य कारण आहे, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक राजेंद्र चरणुकाका पाटील बोलताना म्हणाले, “कारखान्याची गाळप क्षमता २५०० मेट्रिक टन असताना मागील हंगामात ३६०० ते ३९०० टन प्रतिदिन गाळप करून उच्चांक गाठला. यंदा मात्र मशिनरीच्या तांत्रिक अडचणी व सुरुवातीच्या जास्त पावसामुळे ऊसाच्या मुळ्या कुजल्या, वाढ खुंटली, त्यामुळे टनेज व साखर उतारा कमी झाला.” भविष्यात मशिनरी सुधारणा करून चांगले गाळप करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्र. कार्यकारी संचालक  रमेश जायभाय यांनी प्रास्ताविक करताना संचालक मंडळाचे नियोजन, शेतकरी, ठेकेदार, मजूर व कर्मचाऱ्यांचे सहकार्य हंगाम यशस्वी करण्याचे कारण असल्याचे सांगितले.या हंगामात जास्तीत जास्त ऊस तोडणी-वाहतुकीसाठी ट्रॅक्टर ठेकेदार भिवा शिंदे, सुनिल जाधव, प्रशांत ठेंगील; डम्पिंग ठेकेदार  वसंत दोलतडे, राजकुमार आसबे, तात्यासाहेब घोडके; बैलगाडी ठेकेदार  भाऊसाहेब पठाडे, रमेश पठाडे, अजिनाथ पन्हाळकर; मशिन तोडणी-वाहतूक ठेकेदार  सुनिल लुगडे, शिवाजी आवताडे, महादेव लोखंडे यांचा संचालक मंडळातर्फे सत्कार करून प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व सभासद शेतकरी, ऊस तोडणी-वाहतूक ठेकेदार, सिझन कंत्राटदार, अधिकारी, कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.सदर प्रसंगी व्हा. चेअरमन  तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे, दादासाहेब दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, अशोक केदार, तानाजी कांबळे, प्रथमेश पाटील, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर यांचेसह नामदेव जानकर, सिद्धेश्वर मेटकरी, भिवा शिंदे, महेश लुगडे, आबा ताड, बहुसंख्य सभासद शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, कामगार संघटना, पतसंस्था पदाधिकारी, ठेकेदार उपस्थित होते. उपस्थितांचे आभार संचालक  रेवणसिद्ध लिगाडे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अशोक उन्हाळे यांनी केले.

Post Views: 8
Previous Post

१० स्वीकृत सदस्यत्वासाठी ६२ जणांचे अर्ज दाखल

Next Post

सांगोल्यात उद्या जगदगुरु नरेंद्राचार्य यांचा पादुका दर्शन सोहळा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सांगोल्यात उद्या जगदगुरु नरेंद्राचार्य यांचा पादुका दर्शन सोहळा

ताज्या बातम्या

वरिष्ठ महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांची नियमित अनुपस्थिती: एक गंभीर समस्या व आव्हान – प्राचार्य डॉ. शिवराया आडवीतोट

February 19, 2026

संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या जयंतीचा उत्साह

February 19, 2026

शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा

February 19, 2026

आमदार उत्तमराव जानकर यांच्या गरुड बंगल्यास कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांची सदिच्छा भेट

February 19, 2026

मुंबई येथे प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांची संयुक्त बैठक संपन्न

February 19, 2026

लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजारांचा दंड

February 19, 2026

शिव जयंतीनिमित्त शिव गितांचा व व्याख्यानाचा कार्यक्रम

February 19, 2026

प्रभाग २२ मध्ये १४ लाखांच्या रस्त्याचे भूमिपूजन; आश्वासनांपासून कृतीकडे विकासाची वाटचाल

February 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0686932

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697