Wednesday, April 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

१० स्वीकृत सदस्यत्वासाठी ६२ जणांचे अर्ज दाखल

तरुण भारतbyतरुण भारत
February 19, 2026
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महापालिकेतील १० स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी आयुक्त कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळाली.१० जागांसाठी ६२ अर्ज दाखल झाले आहेत. भाजपने २० इच्छुकांना अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, स्वीकृत नगरसेवकसाठी जोरदार रस्सीखेच असल्याचे चित्र पाहायला मिळाले. भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर , माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्यासह अनेकांनी अर्ज भरले. एमआयएम पक्षाच्या वतीनेही अर्ज दाखल करण्यात आले आहेत. भाजपकडून सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न झाला आहे.

         महापालिकेच्या नामनिर्देशित म्हणजेच १० स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीकरिता संबंधितांना आज बुधवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते  दुपारी १.३० वाजेपर्यंत महापालिकेतील  इंद्रभुवन इमारतीतील आयुक्त कार्यालयात अर्ज सादर करण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली. नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी हे अर्ज स्वीकारले. वरिष्ठ लिपिक नितीन गायकवाड यांनी त्यांना सहकार्य केले. रितसर अर्ज घेऊन त्यांना पावती देण्यात आली.

           सोलापूर महापालिकेची नवीन टर्ममधील पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता बोलवण्यात आली आहे. या सभेमध्ये १० स्वीकृत सदस्य, स्थायी समितीचे १६ तर परिवहन समितीच्या १२ सदस्यांची नियुक्ती होणार आहे.

नूतन महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. ही सभा शुक्रवार, २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेच्या कै, यशवंतराव बळवंतराव  सभागृह (कौन्सिल हॉल) येथे होणार आहे. महापालिकेचे नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी या सभेचा अजेंडा प्रसिद्ध केला आहे. याशिवाय महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम २०१२ नुसार सोलापूर महानगरपालिकेत 10  नामनिर्देशित सदस्यांची आयुक्तांच्या  दि.9 फेब्रुवारीच्या टिपणीत नमूदप्रमाणे नियुक्ती करण्याचा विषय सभेपुढे ठेवण्यात आला आहे. संख्याबळानुसार भाजपाला नऊ तर एमआयएमला एक स्वीकृत सदस्य नामनिर्देशित करता येणार आहे.

           दरम्यान, महापालिकेच्या नामनिर्देशित अर्थात १० स्वीकृत सदस्यत्वासाठी बुधवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते  दुपारी १.३० वाजेपर्यंत महापालिकेतील आयुक्त कार्यालयात अर्ज स्वीकृती प्रक्रिया पार पडली. दहा जागांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. सकाळी ११.४० वाजता भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यासह इच्छुक उमेदवारांनी महापालिकेत येऊन स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले. त्याचबरोबर एमआयएम पक्षाकडूनही इच्छुकानी अर्ज दाखल केले. एकूण ६२ जणांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, यामध्ये भाजपाकडून विविध समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे दिसून येते.

भाजपकडून 20 इच्छुकांना अर्ज

 भरण्याच्या सूचना : तडवळकर 

भाजप पक्षाकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुकांच्या अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २० इच्छुकांना अर्ज भरण्याच्या सूचना पक्षाने दिल्या आहेत. त्यानुसार माझ्यासह 20 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. येत्या 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत 20 पैकी नऊ जणांची नावे निश्चित करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिल्यानंतर ती यादी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे येईल. त्यानंतर 20 फेब्रुवारीच्या सभेत

 ही नावे घोषित करण्यात येतील, असे भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी स्पष्ट केले. 

पक्षाने आदेश दिल्यास एक पद सोडायलाही तयार 

एक व्यक्ती एक पद या नियमानुसार काय निर्णय घेणार या प्रश्नाच्या उत्तरात भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर म्हणाल्या, स्वीकृत नगरसेवकसाठी पक्षाने अर्ज भरण्याचे सुचित केल्यानंतर मी अर्ज दाखल केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आमदार आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे अध्यक्ष पदाचीही जबाबदारी आहे. यामुळे पक्षाने आदेश दिल्यास पद सोडण्यास तयार आहे, असे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी यापूर्वी अशोक निंबर्गी हे शहराध्यक्ष असताना ते स्वीकृत नगरसेवकही होते याची आठवण करून दिली.

एमआयएमतर्फे नईम सालार यांचे नाव : शेख 

एमआयएम पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून स्वीकृत नगरसेवकसाठी नईम सालार यांचे नाव अधिकृतरित्या आले आहे. त्यानुसार आम्ही त्यांचा अर्ज भरला आहे. इतर कोणी अर्ज भरला असेल तर आम्हाला त्यांची माहिती नाही, असे एमआयएमच्या गटनेत्या वहिदा भंडाले – शेख यांनी सांगितले. यावेळी या पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते.

या इच्छुकांनी दाखल केले अर्ज

आज नियोजित वेळेत भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर , प्रभाकर जामगुंडे, जगदीश पाटील , शशी थोरात , अक्षय आंजिखाने, श्रीनिवास दायमा, सुधा अळळीमोरे , श्रीकांत घाडगे , जवाहर जाजू , अनुप खंडेलवाल , केतन शहा, वृषाली चालुक्य ,पांडुरंग दिड्डी, ॲड. राजन दीक्षित, ॲड. साधना संगवे , सूरज चव्हाण, कृष्णा झंवर, महेश तापडिया,  लक्ष्मीकांत दरक, मल्लिनाथ राचेटि, सोमनाथ केंगनाळकर , रुद्रेश बोरामणी , देवेंद्र भंडारे , नागेश भोगडे , सचिन कुलकर्णी , जय साळुंखे, एमआयएमएम कडून नईम सालार , गाजी जहागिरदार,

फिरदौस पटेल यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी अपक्ष म्हणून असे एकूण ६२ इच्छुकांनी अर्ज भरले आहेत.

Post Views: 43
Previous Post

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

Next Post

स्पर्धेत टिकण्यासाठी कमी दिवसांत जास्त गाळपाची गरज

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

स्पर्धेत टिकण्यासाठी कमी दिवसांत जास्त गाळपाची गरज

ताज्या बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात सोलापूर शहरात साजरी करण्यात आली

April 14, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने दोघांनी बांधली रेशीमगाठ

April 14, 2026

इंदिरा कन्या प्रशालेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी

April 14, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने दोघांनी बांधली रेशीमगाठ

April 14, 2026

क्रिकेट सांख्यिकी सुरेश फुलपाटी यांचे निधन

April 14, 2026

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली

April 14, 2026

नवनिर्वाचित जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार सोहळा

April 14, 2026

पानगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0809804

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697