दीक्षाभूमी येथे चालू असलेले पार्किंगचे काम त्वरित थांबवण्यात यावे
मुदखेड बौद्ध समाजाच्या वतीने तहसील कार्यालय येथे निवेदन
मुदखेड ता प्र
नागपूर दिक्षाभुमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती कडुन चालु असलेल्या पार्किंगच्या बांधकामाचा निषेध करत मुदखेड शहर व तालूक्यातील समस्त बौध्द समाजबांधवांच्या वतीने तहसील कार्यालय येथे दि.२ जूलै २०२४ रोजी निवेदन देण्यात आले डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती च्या मार्फत चालु असलेले पार्किंगचे बांधकाम हे आंबेडकरी जनतेच्या भावना विचारात न घेता चालु केलेले आहे. प्रतिवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिना निमीत्त वरिल ठिकाणी लाखोच्या संख्येने बौध्द अनुयायी मोठ्या श्रध्देने जमा होतात.
त्या करीता दिक्षाभुमी परिसारामध्ये मोकळ्या जागेची अत्यंत आवश्यकता आहे. जर त्या ठिकाणी अंडरग्राऊंड पार्किंग तयार केली तर मोठ्या प्रमाणामध्ये जमनाऱ्या अनुयायांना खुप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागेल. याकरिता सदर बांधकाम त्वरित बंद करुन केलेले बांधकाम पाडुन पुर्विप्रमाणे मोकळी जागा उपलब्ध करुन देण्या करिता आंबेडकरवादी समाजभावणेचा विचार करुण शासनाने यामध्ये त्वरित योग्यती पावले उचलुन कायदा व सुव्यस्था आबादित ठेवण्याचे काम करावे नुकत्याच आलेल्या माहितीनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्यनागार्जुन ससाई, डॉ. राजेंद्र गवई, यांच्या लेटरहेड वर राजेंद्र गवई व वि.मा. गवारे, प्रा. डि.जी. दाभाडे व इतर ट्रस्टीच्या वतीने दि. ०१ जुलै २०२४ पासुन वरिल ठिकाणी चालु असलेले बांधकाम तात्काळ प्रभावाणे बंद करण्यात येत असल्याचे पत्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आले आहे.
सदरची बाब सत्य असल्यास आम्ही सर्व खालील सह्या करनार त्यांच्या या निर्नयाचे स्वागत करित आहोत.परंतु जेवढे बांधकाम झालेले आहे, ते बांधकाम पाडुन दि.१४ ऑक्टोंबर २०२४ च्या पुर्वी त्या ठिकाणची जागा रिकामी करुन देण्यात यावी. अन्यथा समाजाच्या जनभावनेचा उद्रेक होऊन कायदा व सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता नाकारता येनार नाही.
करिता शासनाने बौध्द बांधवांच्या भावना लक्षात घेवुन योग्य ती कार्यवाही करावी असे निवेदन तहसील कार्यालय येथे देण्यात आले यावेळी उपस्थित असलेले अँड.कमलेश चौदंते,
अँड.बाबासाहेब चौदंते, राहुल चौदंते, राहुल अप्पा चौदंते, महेंद्र, चौदंते, कुणाल चौदंते,प्रदिप कदम, निखिल चौदंते,सुरज चौदंते, सिद्धार्थ चौदंते, कपिल कांबळे यांच्या सह आदि बौद्ध बांधव उपस्थित होते.