माहूर तालुका क्रीडा संकुल निर्मितीसाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर; लवकरच….क्रीडा संकुल उभारणीचा मुहूर्त!
-आ. भीमराव केराम
माहूर , दि. ०३ जुलै
महाराष्ट्र शासन,क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य च्या वतीने राज्यातील माहूरसह एकूण चार ठिकाणच्या तालुका क्रीडा संकुल निर्मिती च्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.शासन अध्यादेशानुसार तालुका क्रीडा संकुल च्या अनुदान मर्यादेतही वाढ करण्यात आली त्यासंदर्भातील क्रीडा व युवक सेवा संचलनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे सहसंचालक सुधीर मोरे यांनी दि. २८ जून रोजी पाठविलेले लेखी पत्र जिल्हा क्रीडा अधिकारीअधिकारी व संबंधित तालुका क्रीडा अधिकारी यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.यासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला क्रीडापटू व क्रीडाप्रेमींच्या क्रीडा संकुल च्या मागणीला किनवट /माहूर विधानसभा मतदार संघाचे कार्यकुशल आमदार भीमराव केराम यांच्या सततच्या पाठपुराव्याला व सार्थक प्रयत्नांना अखेर यश आले असून,क्रीडापटू, क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे स्फुरण चढले असून,माहूर येथील
क्रीडा संकुलाच्या निर्मिती साठी तब्बल ४ कोटी,९९ लक्ष ८८ हजार रुपये निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच बांधकामाचा मुहूर्त काढण्यात येणार आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे यांनी याविषयी माहिती दिली आहे.
राज्यातील विविध चार ठिकाणी तालुका क्रीडा संकुल निर्मिती च्या शासन अध्यादेशानुसार वाढीव अनुदान प्राप्ती साठी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या तालुक्यात माहूर-(नांदेड जिल्हा) -₹ ४९९.८८ लक्ष, झरीजामणी ( जि. यवतमाळ) -₹ ४९४.८५ लक्ष, मारेगाव (जि. यवतमाळ)-
₹ ४८९.०२ लक्ष, व जुन्नर (जि. पुणे) -₹ ५००.०० लक्ष ही आहेत.
माहूर व तालुक्यातील विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंची वाढती संख्या,सोई,सुविधा, साधने, मैदान, अनुभवी प्रशिक्षक उपलब्धतेचा अभाव लक्षात घेता माहूर तालुक्याचे नाव क्रीडा क्षेत्रात मोठे करणाऱ्या खेळाडूंना उपरोक्त बाबींसह क्रीडांगण आणि क्रीडासंकुल उपलब्ध करुन देणे खुप गरजेचे होते. क्रीडा संकुल उभारणीची मागणी अनेक वर्षा पासून जेष्ठ खेळाडू तथा प्रशिक्षक सुरेश गिऱ्हे यांचेसह अनेक ज्येष्ठ व उदयोन्मुख खेळाडू तथा क्रीडाप्रेमींतून सातत्याने करण्यात येत होती. याच मागणीच्या अनुषंगाने भाजपाचे माहूर नगरपंचायतचे नगरसेवक गोपू महामुने, भाजपाचे जेष्ठ नेते अनिल वाघमारे यांनी माहूर ते मंत्रालया पर्यंत सर्वतोपरी अतोनात प्रयत्न करीत लोकप्रिय आ. भिमराव केराम यांच्या कडून क्रीडा संकुल निर्मितीकरीता त्वरित जागा व बांधकामासाठी ४ कोटी ९९ लक्ष ८८ हजार रुपये निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.शहरातील शासकीय आश्रम शाळा पांडवलेणी रोड लगत क्रीडा संकुल उभारणीसाठी जागा निश्चित करण्यात केली व क्रीडा विभागा तर्फे जागा मागणीचा प्रस्ताव तहसीलदार माहूर यांच्या कडे दिला होता.महसूल प्रशासनाने जागा मागणी प्रस्तावास मंजुरी देऊन अडीच एकर जागा क्रीडा विभागाच्या स्वाधीन केली आहे.
किनवट /माहूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भिमराव केराम यांच्या प्रयत्नांतून तालुकास्तरावर या जागेत व मोठ्या निधीचे अद्यावत असे क्रीडा संकुल लवकरच साकारण्यात येणार आहे .
या सोईमुळे माहूर शहर व तालुक्यातील विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना या क्रीडा संकुलात सराव करण्यासाठी सोयी, सुविधा, साधने व मैदान उपलब्ध होणार आहे. त्यामळे माहूर सारख्या आदिवासी बहुल ज्ञतालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात नवी दिशा व जिवनात करीअर घडविण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहे.
————————–
क्रीडा संकुल उभारताना सर्व खेळाडू, क्रीडाप्रेमींसह आम्ही देखील लक्ष घालू व हे क्रीडा संकुल उत्तम दर्जाचे खेळाडू घडविण्याचे ठिकाण बनेल या दिशेने काम करु !”
किशोर यादव,माहूर तहसिलदार तथा क्रीडा संकुलाचे प्रशासकीय कार्याध्यक्ष
————————–
सदरील क्रीडा संकुलात इमारत अंतर्गत व बाह्य क्रीडांगणांचा समावेश
असून यात बॅटमिंटन हॉल, बास्केट बॉल, जिमनॅस्टिक, ज्यूदो कराटे, पॉवर लिफ्टींगसह बाह्य मैदानात २०० मिटरचा ट्रॅक यांसह आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
; जयकुमार टेंभरे,नांदेड जिल्हाक्रीडाधिकारी
————————-
…माहूर शहरात क्रीडा संकुल व्हावे या बद्दल माझी सतत १५ वर्षा पासूनची मागणी आज आ. भीमराव केराम यांच्या प्रयत्नातुन पूर्ण होत आहे
; सुरेश गिऱ्हे – माहूर ता. क्रीडा समिती सदस्य /खेळाडू तथा क्रीडा प्रशिक्षक