आढा शिवारात विहिरीत पडले तीन रोही.
दोघांचा मृत्यू , एकाला वाचविण्यात रॅपिड रेस्क्यू पथकाला यश .
जाफराबाद तालुक्यातील आढा शिवारातील घटना.
जाफराबाद तालुक्यातील आढा येथील शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत पडलेल्या रोहीला बाहेर काढण्यासाठी कार्यवाही करताना रॅपिड रेस्क्यू पथकातील कर्मचारी.
तभा वृत्तसेवा
विष्णु मगर
टेंभुर्णी / प्रतिनिधी
जाफराबाद तालुक्यातील आढा येथील शेतकरी गणेश तेजराव वाकोडे यांच्या शेतातील 50 फूट खोल विहिरीत गुरुवारी रात्री (ता.२७) तीन रोहि पडल्याचे शेतकऱ्याला आढळून आले. त्यांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली. त्या अनुषंगाने वन परीक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे यांनी घटनास्थळी वनविभागाकडून मॅन विथ इंडीज संस्थेच्या रॅपिड रेस्क्यू पथकाला पाठविले. रेस्क्यू टीम घटनास्थळी तात्काळ पोहोचून पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर एका रोहिला वाचवण्यात यश आले. त्या रुईच पारा पायाला मार लागला असल्याने तर डॉक्टर मनोज कुमार पांडे यांनी बाहेर काढल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. इतर दोन रोहि चा विहिरीतच मृत्यू झाला.
आढा येथील शेतकरी श्री वाकोडे नेहमीप्रमाणे सकाळी शेतात पाहणीसाठी गेले असता तीन रोहिं विहिरीत पडले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या संदर्भात वन विभागाला कळविले. दरम्यान विहिरीत रोही पडल्याची माहिती गावकऱ्यांना होतातच विहिरी भोवती मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी गर्दी केली.
पन्नास फूट खोल असलेल्या विहिरीमध्ये खडक असल्याने दोन रोहि ना मार लागून ते गंभीर जखमी झाले.त्यातच त्यांचा मृत्यु झाला.
दरम्यान वनविभागातर्फे छत्रपती संभाजीनगर येथील मॅन विथ इंडीज संस्थेच्या रॅपिड रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले. वन्यजीवरक्षक आशिष जोशी व त्यांच्या टीमने ५ तासांच्या अथक प्रयत्नांनी सर्वांना शिताफीने बाहेर काढले. मृत झालेल्या दोन रोहि चां पोस्टमार्टम करून त्यांना त्याच परिसरात खड्डा खोदून दफनविधी करण्यात आला. तर एका रोहीच्या पायाला मार असल्याने प्राथमिक उपचार करून त्याला जालन्यातील वन उद्यानात आणून उपचार करण्यात आले व नंतर जालना येथील व नद्यांना सोडून देण्यात आले.
या कार्यवाहीत रेस्क्यू टीमचे दिपक वाटाणे, मनोज गायकवाड, चिदंबर काळे, सुरज पानकडे, अनिकेत वाघमारे यांनी योगदान दिले. तसेच वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी योगेश डोमळे, डॉ. मनोजकुमार पांडे, डॉ. झांबरे हे यावेळी उपस्थित होते.