सोलापूर – २१ डिसेंबर २०२५ रोजी काव्यप्रेमी शिक्षक मंच, सोलापूर शाखा भंडाराच्या वतीने ए.के. सेलीब्रेशन या नामांकित हॉटेलमध्ये घेण्यात आलेल्या काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या १६ व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलन प्रसंगी संमेलन अध्यक्ष म्हणून बोलताना ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष तथा विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते म्हणाले, “एका अशा संमेलनात येण्याचा योग आला की, ज्या संमेलनात येणारे सर्व कवी व साहित्यिक आपल्या स्वखर्चाने व कोणतीही अपेक्षा न ठेवता येतात आणि संयोजक पदरमोड करून संमेलन यशस्वी करतात अशा काव्यप्रेमींबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे.”
झी मराठी फेम अभिनेते तथा प्रकल्प अधिकारी राजाभाऊ धर्माधिकारी यांच्या हस्ते सदर साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून अहिल्यानगरचे प्रसिद्ध लेखक तथा ग्रामसेवा दिवाळी अंकाचे उपसंपादक राजेंद्र फंड, स्वागताध्यक्ष दीपक सपकाळ, काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्य समितीचे अध्यक्ष आनंद घोडके, सचिव कालिदास चवडेकर, कोषाध्यक्ष कृष्णा शिंदे, उपाध्यक्ष प्रमोद बाविस्कर, सहसचिव सौ. जया नेरे, सदस्य भाऊसाहेब सोनवणे, सौ.वर्षा भांदर्गे, रामदास देशमुख, सुप्रसिद्ध साहित्यिक प्रमोद अनेराव, मनोज केवट, संयोजक सौ.कविता कठाने, मंगलाताई डहाके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सकाळी ८:३० वाजता उद्घाटन पूर्व दोन कवी संमेलनाचे सत्र झाले. त्यानंतर ११ वाजता उद्घाटन, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण, पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. दुपारच्या सत्रात गझल मुशायरा, परिसंवाद, हास्य कवी संमेलन व बोली भाषेतील कवी संमेलन इत्यादी सत्र संपन्न झाले. संमेलनाचा रात्री ८ वाजता समारोप झाला.
सदर संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रा. विना डोंगरवार, डॉ. अस्मिता नानोटी, टी. डी. तनुश्री, प्रा. जयश्री सातोकर, प्रगती सोनटक्के, कविता दाते निशा काळे, डॉ. गिता वाळके, भाग्यश्री शिवणकर, डॉ. मुक्ता आगाशे, सोनाली कोरे, सारिकाताई दोनोडे, मेघा भांडारकर, मेघा चेटूले, निलिमा लांबकाने, विजयाताई कोरे, वैशाली गोमकाळे, झाशीराम पटोले, विद्याताई सार्वे, टिकाराम कठाणे, देवेंद्र मेढे, रोशनी मेंढे, डॉ. माधवी राखडे, उषा घोडेस्वार, सुषमा पडोळे इत्यादी सावित्रीच्या लेकींनी परिश्रम घेतले. विशेष म्हणजे सदर संमेलनात २५० हून अधिक साहित्य रसिक समारोपापर्यंत उपस्थित होते.
फोटो ओळी – डावीकडून सौ.दाते, कालिदास चवडेकर, आनंद घोडके, राजेंद्र फंड, संमेलनाध्यक्ष प्रदीप दाते, राजाभाऊ धर्माधिकारी, दीपक सपकाळ, सौ.जया नेरे, सौ.निशा खापरे, अर्चना कोहळे, प्रा.अपर्णा कल्लावार व संयोजक सौ.कविता कठाने

























