सोलापूर – बेगम पेठ परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादातून चारचाकी गाडीची तोडफोड झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. या प्रकरणात शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख मुस्ताक शेख यांच्यावर आरोप करण्यात आले असून, तोडफोडीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेगम पेठेतील संपर्क कार्यालयाच्या बाजूला अफसर शेख यांनी आपली चारचाकी गाडी उभी केली होती. गाडी लावण्याच्या कारणावरून मुस्ताक शेख आणि अफसर शेख यांच्यात वाद झाला. हा वाद चिघळत गेला आणि त्यातून संबंधित गाडीची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. घटनेचे काही व्हिडिओ मोबाईलवर चित्रीत झाले असून ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. उर्वरित दृश्ये कॅमेऱ्यातही कैद झाली आहेत.
दरम्यान, स्थानिक रहिवाशांनी गंभीर आरोप करत सांगितले की, वादाच्या वेळी महिलांशी शिवीगाळ करण्यात आली. संबंधितांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच गाडीच्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे

























