मराठी सिनेसृष्टीला अनेक नामवंत कलाकार लाभले. या कलाकारांनी सिने इंडस्ट्री उत्कृष्ट काम करून उत्तम कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर केल्या. पण आज या मराठी इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी सिनेमां मधील उत्कृष्ट अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले आहे. रवींद्र बेर्डे यांनी मराठी सोबतच हिंदीमध्ये देखील आपल्या अभिनयाचा दबदबा निर्माण केला होता. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र बेर्डे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांनी आपल्या भूमिकांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली होती. दिवंगत रवींद्र बेर्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांना मिळो ही प्रार्थना.