तभा फ्लॅश न्यूज/भोकरदन : सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामसेविकांनी संगनमत करून बोगस खोटा ठराव अंधारात लिहून जनतेची दिशाभूल करून फसवणूक केल्याने चौकशी करुन तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी शिवशक्ती कैलास आश्रमाचे शिवरुद्र योगी बाबा यांच्यासह ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भोकरदन तालुक्यातील खादगाव येथील ग्रुप ग्रामपंचायतीने दिनाक ०२ ऑगस्ट २०२५ रोजी खादगाव येथे घेतलेली ग्राम सभेची चुकीची अलौस्मेट करून लोकांची दिशा भरकटउन चुकीचा पद्धतीने लोकांकडून सह्या घेणे, तसेच ना बालकाचा १८ वर्षाच्या आतील मुलांच्या सह्या घेऊन ठराव हा लोकांना समोर न घेता अंधारात पारित केला.
तसेच ग्रामपंचायत सदस्य कृष्णा पवार व गावातील अतिक्रमणधारक नागरिकांनी या ठरावाचा चुकीचा उपयोग करून खादगाव मध्ये शिव शक्ती कैलास आश्रम यांना मंदिरासाठी जागा देऊ नये. असा अर्ज सर्व कार्यालयास केला. तर ग्रामपंचायत सदस्य कृष्णा पवार हे सुस्थितीत ग्रामपंचायत सदस्य असुन त्यांनी शासकीय गायरानामध्ये त्यांच्या परिवाराने सिमेंट क्रोक्रीट ची घरे बांधून अतिक्रमण केल्याचा आरोप करुन त्यांची चौकशी करण्याची मागणी या निवेदनात केली आहे.