पंढरपूर – महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त प्रतिष्ठान आयोजित विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सन २०२६-२७ नूतन पदाधिकारी निवडी श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास, पंढरपूर येथे प्रा.सुदाम गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली व प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक डि.राज सर्वगोड, सचिव अनिल ननवरे, नितीन काळे, विलास जगधने, महावीर धोडमिसे,आशा बागल,विशाल आर्वे,राजेंद्र ताठे व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या.
यावेळी गतवर्षीच्या सचिवपदाचे उल्लेखनीय कार्य, सामाजिक, विवेकशील व्यक्तीमत्व म्हणून यावर्षी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून श्रीकांत चंदनशिवे सर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व नूतन कार्यकारणी निवड प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक डि.राज सर्वगोड व कार्यकारिणीतील सदस्य, मान्यवरांनी जाहीर केली. प्रतिष्ठानच्या स्थापनेपासूनच सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा अबाधित ठेवून यावर्षीही विविध लोकोपयोगी सामाजिक उपक्रम घेऊन खऱ्या अर्थाने विचारांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे एकमताने ठरले. यावेळी नूतन उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या नूतन कार्यकारिणीमध्ये स्वागताध्यक्षपदी अजिंक्य देवमारे ,कार्याध्यक्षपदी मंजुळा धोडमिसे, उपाध्यक्षपदी सतिश खडके, प्रभाकर गायकवाड, निमंत्रकपदी नागेश कांबळे, भीमाशंकर इंगोले, अनिता आसबे, वंदना कसबे,समाधान गिड्डे,सहसचिवपदी काशिनाथ चौगुले, रामदास नागटिळक, खजिनदारपदी प्रतीक कुंभारे,सहखजिनदार संजय कबाडे, प्रसिद्धीप्रमुखपदी प्रविण नागणे, अपराजीत सर्वगोड, सोहन जैस्वाल, संघटकपदी पद्माकर सर्वगोड, संजय घोडके, नवनाथ गायकवाड, शिवाजी घाडगेआदी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.
यावेळी बंटी वाघ, विनोद धुमाळ,आदम बागवान, विकी कांबळे, शरीफा पठाण, सुभाष जवारे, सतीश जवारे,आण्णा धोत्रे, पांडुरंग इरकल, सुभाष काटे, काशिलिंग चौगुले, दत्तात्रय लोंढे, संगम सर्वगोड, रिहाना आतार, नवनाथ किरत,अमित जाधव, बाळासाहेब नाईकनवरे, प्रवीण सरवदे, श्याम बेंद्रे, माधुरी धोत्रे ज्योती गुरव, लखन सोनवणे,अक्षय लोखंडे, अक्षय थोरात, रोहित कांबळे आदी विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.
























