लोकसभा निवडणुकीच्या आजच्या चौथ्या टप्प्यात, 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांसाठी मतदान होत आहे. या मतदारसंघातील लोक मोठ्या संख्येने मतदान करतील आणि युवा मतदार तसेच महिला मतदार यात प्रामुख्याने अग्रेसर असतील अशी मला खात्री आहे. अधिकाधिक मतदारांनी विक्रमी संख्येने मतदान करावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
मोदींनी एक्स अकाऊंटवरुन मराठीसह हिंदी, इंग्रजी, बंगाली आणि तमिळ भाषिक मतदारांना मतदानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
त्यांनी म्हटले आहे, चला, आपण सगळे आपले कर्तव्य बजावूया आणि आपली लोकशाही अधिक बळकट करूया.