सोलापूर – सिद्धार्थ नगर येथील विचारक्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे महिला दिन साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम सावित्रीबाई फुले व रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांचे महिलांविषयी व स्त्रियांविषयी कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.
रमाई यांच्या ममता व त्यागाबद्दल स्मरण करून महिला दिन उत्साहात व आनंदात साजरा झाला. ह्याप्रसंगी जयश्री जगधने, सुवर्णा शिवशरण, सत्यभामा शिरसे, रत्नाबाई दुपारगुडे, मिनल कांबळे, मयुरी शिरसे, अनुराधा गाडे, रवेन रणदिवे, स्वरांजली कांबळे उपस्थित होते.

























