मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं आंदोलन मराठवाड्यात तापताना पाहायला मिळत आहे. जालना येथे महिला तहसीलदाराची गाडी फोडली आहे. तर, नांदेड आणि बीड जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक करण्यात आल्याने वातावरण तापले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून रविवारला अमरावती- पंढरपूर बस फेरी रद्द केली. तर फल: सोमवारला अमरावती विभागावून मराठवाड्यात जाणाऱ्या सर्व ९ फेऱ्या स्थिती पाहून सोडण्यात येईल, असे सहायक विभागीय नियंत्रक अभय भिवरे यांनी सांगितले. मात्र संभाजीनगर , हिंगोली, परभणी, नांदेड, लातूरवरून सर्वत्र जाणाऱ्या बस सेवा बंद करण्यात आल्याने रिस्क घ्यायला कोणतेच एसटी डेपो तयार नाही. त्यामुळे सोमवारला अमरावतीवरून मराठवाड्यात जाणाऱ्या 9 फेऱ्या स्थगित करण्यात आल्या आहेत.
अमरावती विभागातून पंढरपूर २ फेऱ्या, नांदेड २ फेऱ्या, हिंगोली – १, संभाजीनगर-३, जालना – १ -१, अशा ९ फेऱ्यांचा समावेश आहे.रविवारला ९ पेकी ८ गाड्या दिवसभरात रवाना झाल्या. मात्र सायंकाळी ६ वाजता अमरावती डेपोतून पंढरपूरला जाणारी बस सेवा रद्द करण्यात आली तर आज सकाळी केवळ जालना गाडी सोडण्यात आली व इतर सर्व गाड्या रद्द करण्यात आल्यात.