जुई गडकरी सध्या सर्व इतर आघाडीच्या नायिकांना भारी पडत आहे. तिची ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. मात्र अभिनेत्रीला मात्र ऑनस्क्रिनवरची ती आवडत नाही.
टीव्हीवर आपण छान दिसावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी हे कलाकार मंडळी नानाविविध प्रकार करत असतात. या कलाकारांना पाहूनच त्यांच्या चाहत्यांनासुद्धा आपण देखील त्यांच्याप्रमाणेच दिसावे असे वाटते. बरेचदा ते तसे प्रयत्नदेखील करतात. चाहता वर्ग आपल्या आवडत्या कलाकाराची स्टाइल, त्यांच्या साड्या, त्यांचे इतर कपडे, केस, दागिने या सर्व गोष्टींचे अनुकरण करत असतात. पण एखाद्या कलाकाराला स्वत:चा टीव्हीवरील प्रतिमा आवडत नसेल तर….
सध्या टीआरपीच्या लिस्टमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या जुईच्या बाबतीत असेच काहीसे घडते. जुईचे म्हणणे आहे की तिला ऑनस्क्रिनवरची ती आवडत नाही. यासंदर्भात तिने नुकताच एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्याचे झाले असे की, ठरलं तर मग फेम अभिनेत्री जुई गडकरीने आपल्या सोशल मीडियावर तिच्याच मालिकेच्या एका सीनचा व्हिडिओ शेअऱ केला आहे. आणि त्यावर “मला बऱ्याचदा ऑनस्क्रीनवरील मी आवडत नाही. पण या सिक्वेंसमध्ये मी जशी दिसले आहे ते मला खूप आवडलं.” असे लिहिले आहे.
जुईच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिची सध्या स्टार प्रवाहवर सुरु असलेल्या ठरलं तर मग या मालिकेने अनेक जुन्या आणि आघाडीच्या मालिकांना मागे टाकत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. जुईने या मालिकेत सायलीची भूमिका साकारली आहे. जी प्रेक्षकांच्या फारच पसंतीस उतरली आहे. जुईने यापूर्वी पुढचं पाऊल या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली होती. तिची त्या मालिकेतील कल्याणी ही भूमिकासुद्धा प्रेक्षकांना खूप आवडायची. त्यानंतर बिग बॉस मराठीमध्ये स्पर्धक म्हणून दाखल होऊन तिने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. पडद्यावर साधी भाळी सोषिक दिसणारी जुई त्या शोमध्ये मात्र वेगळ्याच अवतारात पाहायला मिळाली होती.