सोलापूर – मोलमजुरी करुन कुटुबाचा चरितार्थ चालविणा-या मार्डी येथील दशरथ कटरमल यांची कन्या पूजा कटरमल हिने बारावीच्या परीक्षेत उत्तर सोलापूर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला. तिच्या या यशाबद्दल मार्डी गावचे सुपुत्र व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी आपल्या जिल्हा परिषदेतील कार्यालयात बोलावून तिचा सत्कार केला.
घरची परिस्थिती बेताचीच…आई दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करते.तर वडील दशरथ बांधकाम, खोदाई जे मिळेल ते काम करतात.मात्र परिस्थितीबद्दल कुढत न बसता पूजाने बारावीच्या परीक्षेत कला शाखेत 85 टक्के गुण मिळवून उत्तर सोलापूर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला.तिच्या या यशाची दखल घेऊन जिल्हा परिषद उपाध्यक्ष पवार यांनी मंगळवारी तिला, तिच्या आई वडिलांना व आजीला जिल्हा परिषदेत बोलावून सत्कार केला.पूजाचा आदर्श जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा,असे सांगून उपाध्यक्ष पवार यांनी तिला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देत शैक्षणिक मदतीसाठी आपण सदैव तयार असल्याचे सांगितले.
फोटो ओळी – बारावीच्या परीक्षेत उत्तर सोलापूर तालुक्यात प्रथम आलेल्या मार्डी येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयालयातील पूजा कटरमल या विद्यार्थिनीचा सत्कार करताना जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, त्यावेळी छायाचित्रात पूजाचे आईवडील आजी
























