सांगोला – सह्याद्री कॉलेचे ऑफ फार्मसी, मेथवडे (ता.सांगोला) मधील बी.फार्मसी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड हेल्थकेयर रेडीनेस प्रोग्रॅम या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन दि.४ ते ६ मे रोजी करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उदघाटन पुणे येथील माईंडवर्कचे डायरेक्टर कमल कुमार, संस्थाध्यक्षा अनिता इंगवले, विश्वस्त विश्वजीत इंगवले, प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाले. यावेळी कमल कुमार यांनी हेल्थ इन्शुरन्स पोर्टेबिलिटी अँड अकौंटंयाबिलिटी ऍक्टची गोपनीयता आणि रुग्ण डेटा संरक्षण मानकांशी संबंधित क्षेत्रामधील सखोल व्यावहारिक ज्ञान उदाहरणासहित विशद केले.
आरोग्यसेवा संस्था, केपीओ आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स मध्ये आत्मविश्वासाने प्रवेश करून यशस्वी होण्याचे तंत्र सांगितले. उद्योग समूह व कंपन्यांमध्ये नोकरीला जाताना येणाऱ्या अडचणी व त्यास कशा रीतीने सामोरे जावे, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच मुलाखत कौशल्य, इंग्रजी भाषेचा प्रभावी वापर, प्लेसमेंट स्किल, गटचर्चा, व्यवसाहिक नीतिशास्त्र, मौलिक कौशल्ये या विषयावर प्रात्यकक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांना उपस्थिती प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रा.एस.एस.काळे, प्रा.एस.पी.जोकार यांचे योगदान लाभले.



























