अक्कलकोट – आ.सचिन दादा कल्याणशेट्टी यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड होणे ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मनोगत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश मालक इंगळे यांनी व्यक्त केले.
नुकतेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिन विरोध निवड झाल्याबद्दल अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानला भेट देवून श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश मालक इंगळे यांनी आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, पुष्पहार, पुष्पगुच्छ व प्रसाद देऊन यथोचित सत्कार करून आमदार सचिन दादांच्या पुढील राजकीय व सामाजिक कार्याला स्वामीमय शुभेच्छा दिल्या. या वेळी नगरसेवक महेश मालक इंगळे बोलत होते.
पुढे बोलताना नगरसेवक महेश मालक इंगळे म्हणाले की आमदार सचिन कल्याणशेट्टी दादांनी नेहमीच शेतकरी, कष्टकरी, सहकार आणि सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम केले आहे व करीत आहेत. त्यांच्या या बिनविरोध निवडीमागे त्यांचे स्वच्छ चारित्र्य, विकासाची तळमळ आणि जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास हेच कारण आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने दादांच्या हातून जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मोठे कल्याण होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. दादांना पुढील वाटचाली साठी मनापासून स्वामीमय शुभेच्छा देतो असेही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शैलेश राठोड, शिवराज स्वामी, मल्लिकार्जुन आळगी, रामचंद्र समाणे, नागराज कुंभार, प्रशांत लोकापुरे यांच्यासह स्वामी भक्त व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण देवस्थान परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते.
(चौकट – सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी माझी बिनविरोध निवड झाली याचे सर्व श्रेय हे जिल्ह्यातील सहकार चळवळीतील सर्व नेते, पदाधिकारी, शेतकरी बंधू आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचे आहे.
ही निवड म्हणजे माझ्यावर टाकलेली मोठी जबाबदारी आहे. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळावे, सहकार चळवळ मजबूत व्हावी यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ही जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना आहे. – आमदार तथा नुतन संचालक डीसीसी बँक – सचिन दादा कल्याणशेट्टी)
Views: 12