
मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा शिवसेनेचा अवघा १ मतदार आहे. त्यामुळे शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न असून विरोधक सुद्धा आपल्या पदरात काय पडते का? यासाठी प्रयत्नशील असत्याचे दिसत आहे .
सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेची निवडणूक सुरू आहे या भाजप महायुतीचे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे वसंत नाना देशमुख यांच्यात सरळ लढत आहे . मोहोळ तालुक्यात एकूण ५० मतदार आहेत.त्यात महा विकास आघाडीकडे फक्त एकच मत आहे आणि उर्वरित ४९ मते ही महायुतीकडे आहेत . महायुतीमध्ये राष्ट्रवादी (अजित),१शिवसेना (शिंदे ) ११ आणि भाजपचे ३७ मतदार आहेत . यामुळे कागदावर आणि प्रत्यक्षात सुद्धा भाजपच श्रेष्ठ ठरणार आहे. मात्र मोहोळ मध्ये माजी आमदार आणि राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना.राजन पाटील भाजपामध्ये आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाचे मतदार वाढले आहेत. तथापि महायुतीमध्ये राजन पाटील यांच्याविरुद्ध शिवसेना( शिंदे ) चे राज्य ओबीसी प्रमुख रमेश बारस्कर आणि जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, राष्ट्रवादी (अजित ) पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि मोहोळचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी(अजित)चे एकमेव जिल्हा परिषद सदस्य विजयराज डोंगरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार राजू खरे आशी स्थानिक विभागणी आहे. यामुळे मोहोळ चे महायुतीचे जुगाड कसे लागणार अशी चर्चा होती . मात्र महायुतीचे उमेदवार माजी आमदार राजाभाऊ राऊत हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके उमेदवार आहेत. त्यामुळे खुद्द फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार आणि एकनाथ शिंदे यांचे आदेश काय आले यावरच पुढची वाटचाल सुरू राहील. या निवडणुकीत व्हीप नसतो असे जाणकारांचे मत आहे; मात्र भाजपाने व्हीप काढल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे या पार्श्वभूमीवर उद्या मतदान होत आहे त्यामुळे महायुती शतप्रतिशत मते मिळणार का त्यात काय अयशस्वी ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया – शशिकांत चव्हाण भाजप जिल्हाध्यक्ष सोलापूर*- पक्षाने या निवडणुकीसाठी व्हिप काढला असून राजेंद्र राऊत हेच आमदार होणार.
रमेश बारसकर राज्य ओबीसी प्रमुख शिवसेना* – आम्ही युती धर्म पाळणार असून आमची सर्व मते राजाभाऊ राऊत यांनाच मिळणार आणि तेच आमदार होणार.
माजी आमदार तथा राज्य सहकार परिषद अध्यक्ष राजन पाटील* – ही निवडणूक लादली गेलेली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर पदाधिकाऱ्यांचा विश्वास आहे त्यामुळे भाजपाचा उमेदवार किमान ५००च्या मताधिक्याने विजयी होईल.
महाविकास आघाडीचे नेते संजय क्षीरसागर* – भाजपा बद्दल जनतेत तीव्र असंतोष आहे याचे प्रतिक म्हणून पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे वसंत नाना देशमुख निश्चित विजय होणार.
शंकरराव वाघमारे माजी जिल्हाध्यक्ष भाजपा* पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे आजी-माजी पालकमंत्री जया भाऊ गोरे आणि चंद्रकांत दादा यांच्या कार्यामुळे आणि करिश्मामुळे जिल्ह्यात भाजपाचे संख्याबळ वाढले आहे. आणि या सर्वांच्या नेतृत्व विश्वास ठेवून मतदान होणार असल्यामुळे भाजपा महायुतीचे उमेदवार राजाभाऊ राऊत हे निश्चितपणे विजय होणार आहेत.*
Post Views: 7