Wednesday, June 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

तरुण भारतbyतरुण भारत
June 17, 2026
in political
0
लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि शेतकरी कल्याण क्षेत्रात मोठी प्रगती झाली. देशाची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचली असून लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
          पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, किसान सन्मान निधी, उज्ज्वला योजना आणि लखपती दीदी योजनेचा उल्लेख करत मोदी सरकारने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या सोलापूर विमानतळ, रेल्वे उड्डाणपूल, ई-बस, आयटी पार्क आणि शेतकऱ्यांच्या एफआरपीसह विविध स्थानिक प्रश्नांवर पालकमंत्र्यांनी भूमिका मांडली.
       दरम्यान, पत्रकारांनी सोलापूर विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधा आणि विमानसेवा बंद होण्याच्या शक्यतेबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना गोरे म्हणाले की, नाईट लँडिंगसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक सुविधा उभारण्यासाठी काही अडथळे असून संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड करून विमानसेवा सुरू ठेवता येणार नाही. न्यायालयाने घातलेली स्थगिती उठल्यानंतर आवश्यक कामे तातडीने पूर्ण केली जातील,असे त्यांनी स्पष्ट केले.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक आणि आसरा चौकातील रेल्वे उड्डाणपुलांच्या रखडलेल्या कामांबाबत विचारले असता, संबंधित कंत्राटदारांना निश्चित मुदतीत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तांत्रिक अडचणी आणि विविध विभागांच्या परवानग्यांमुळे कामाला विलंब होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
           उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आयटी पार्क हे शहरात असावे असे म्हटले आहे. होटगी येथील प्रस्तावित आयटी पार्कबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावर बोलताना पालकमंत्री गोरे यांनी मंजूर झालेल्या जागेवरच आयटी पार्क उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
         या पत्रकार परिषदेस विधान परिषद निवडणुकीचे भाजप महायुतीचे उमेदवार तथा माजी आ. राजेंद्र राऊत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, चेतनसिंह केदार- सावंत, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महापालिका सभागृहनेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, मनीष देशमुख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना एफआरपीची संपूर्ण रक्कम मिळेल
शेतकऱ्यांच्या उसाच्या एफआरपीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, एफआरपीचा एकही रुपया कमी दिला जाणार नाही. आर्थिक अडचणींमुळे काही कारखान्यांकडून विलंब झाला असला, तरी शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम मिळेल, असे आश्वासन पालकमंत्री गोरे यांनी दिले.
विरोधकांचा अभ्यास कमी असल्याचा आरोप
विरोधकांकडून वाढती महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक धोरणांवर होत असलेल्या टीकेला उत्तर देताना गोरे यांनी, विरोधकांचा अभ्यास कमी आहे. विरोधक हे देशाची बदनामी करत असल्याचा आरोप करत कोरोनासारख्या संकटातही भारताची अर्थव्यवस्था मजबूत राहिली, असा दावा पालकमंत्री गोरे यांनी केला.
.. आणि त्या आंतरराष्ट्रीय प्रश्नावर हास्याचे फवारे उडाले
विरोधी पक्ष म्हणतोय की देशामधली फॅसिस्ट विचारधारा ही देशाला कुठल्यातरी वेगळ्या विचारधारेकडे घेऊन जातेय आणि हे सर्वसामान्य लोकांना खाईमध्ये घालणारे आहे. म्हणजे विरोधकांची भूमिका ही चुकीची आहे का फॅसिस्ट विचारधारा ही जोपासणाऱ्या लोकांची भूमिका चुकीची आहे ? या एका पत्रकाराच्या प्रश्नावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आता हा तुमचा प्रश्न आंतरराष्ट्रीय असल्याचे स्पष्ट करताच हास्याचे फवारे उडाले.
Post Views: 14
Previous Post

साखर पेठ हुमा किलिनिक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

तरुण भारत

तरुण भारत

ताज्या बातम्या

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

June 17, 2026

साखर पेठ हुमा किलिनिक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

June 17, 2026
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवे बळ; सोलापूर जिल्ह्यात ४,७४१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण सुरू

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवे बळ; सोलापूर जिल्ह्यात ४,७४१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण सुरू

June 17, 2026
ज्येष्ठांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाची विशेष मोहीम

ज्येष्ठांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाची विशेष मोहीम

June 17, 2026
अनुष्काची जागतिक ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धेत निवड

अनुष्काची जागतिक ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धेत निवड

June 17, 2026
वखारिया विद्यालयात विद्यार्थांचा प्रवेशोस्तव उत्साहात साजरा 

वखारिया विद्यालयात विद्यार्थांचा प्रवेशोस्तव उत्साहात साजरा 

June 17, 2026
अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन करा

अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन करा

June 17, 2026
जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे

जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0914079

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697