बार्शी – सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे ४५२ असे एकूण ६१५ मतदार असतील.
सोलापूर जिल्ह्यात एकूण सहा मतदान केंद्रावरील मतदान होणार आहे. कुर्डूवाडी, उत्तर सोलापूर तहसील कार्यालय, दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय, पंढरपूर तहसील कार्यालय, मंगळवेढा तहसील कार्यालय व अकलूज उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी मतदान होणार आहे.
१) कुर्डूवाडी उपविभाग कार्यालयात एकूण ८० मतदाराचे मतदान होणार आहे. नगरपरिषद करमाळा २३, नगरपरिषद कुर्डूवाडी २३, नगरपंचायत माढा १९,करमाळा तालुक्यातील ६ झेडपी सदस्य व १ पंचायत समिती सभापती, माढा तालुक्यातील ७ झेडपी सदस्य व १ सभापती
२) उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात एकूण १८८ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. बार्शी
नगरपरिषद ४७, वैरागी नगर पंचायत १९ , सोलापूर महानगरपालिका १११ , बार्शी तालुक्यातील ७ झेडपी सदस्य व १ सभापती उत्तर तालुक्यातील झेडपी सदस्य व सभापती असे एकूण ४ जण आपला मतदानाचा हक्क बजावतील
३) दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात एकूण ८९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील अक्कलकोट नगरपरिषद २९, मैंदर्गी नगरपरिषद २३, दुधनी नगरपरिषद २३, अक्कलकोट झेडपी सदस्य व सभापती ७, दक्षिण सोलापूर झेडपी सदस्य व सभापती ७ असे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.
४) पंढरपूर तहसील कार्यालयात एकूण १०० जण आपला मतदानाचा हक्क बजावतील. पंढरपूर नगरपरिषद ४१, मोहोळ नगरपरिषद २३ ,अनगर नगरपंचायत २०, पंढरपूर तालुक्यातील झेडपी सदस्य व सभापती ९, मोहोळ झेडपी सदस्य व सभापती ७ असे एकूण १००.
५) मंगळवेढा तहसील कार्यालयात एकूण ६२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. मंगळवेढा नगरपरिषद २३, सांगोला नगरपरिषद २६, मंगळवेढा झेडपी सदस्य व सभापती ५, सांगोला झेडपी सदस्य व सभापती ८ असे एकूण ६२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.
६) अकलूज विभागीय उपविभागीय अधिकारी कार्यालयात एकूण ९७ मतदार आपला मतदान करतील. अकलूज नगरपरिषद ३०, माळशिरस नगरपंचायत १९, नातेपुते नगरपंचायत १९, महाळुंग – श्रीपुर नगरपंचायत १९, माळशिरस तालुक्यातील झेडपी सदस्य व सभापती १० असे एकूण ६१५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील
सोलापूर जिल्ह्याचा कोण असेल बारावा आमदार हे ६१५ जण ठरवणार आहेत.
Post Views: 11