सोलापूर – श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट व सोलापूर जिल्हा डॉजबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 4 थी सबज्युनिअर व सिनिअर डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धा दिनांक 09 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2025 रोजी अक्कलकोट फत्तेसिंह ग्राउंड वर झालेल्या राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेत व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मिडीयम स्कूल चे 28 विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते.
या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच या विद्यार्थ्यांना सोलापूर जिल्हा डॉजबॉल संघटनेचे संचालक व क्रीडा विभाग प्रमुख श्री संतोष पाटील व मोनिका जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कल्याणी जी एच पर्यवेक्षिका सुनिता मंद्रुपकर व नागमणी पेगडा तसेच क्रीडा शिक्षक संतोष पाटील व मोनिका जाधव व शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मेंढापूरे उपाध्यक्ष सौ यमुना दिड्डी सचिव संतोष गड्डम व सहसचिव नागेश शेंडगे यांनी मनःपूर्वक आभार मानले



























