सोलापूर – दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे दि.१५ व १६ डिसेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या ३६ वी राष्ट्रीय जीत कुने डो स्पर्धेत असोसिएशन ऑफ जीत कुने डो मार्शल आर्ट स्पोर्ट्स सोलापूर च्या ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन फाईट व काता या दोन्ही प्रकारात प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक पटकावला आहे सर्व विद्यार्थी हे महाराष्ट्राकडून प्रतिनिधित्व करत महाराष्ट्र राज्य ला प्रथम क्रमांक ट्राॅफी जिंकली आहे
सदर स्पर्धेसाठी १८ राज्यातून विद्यार्थ्यांचा सहभाग होता स्पर्धेचे उद्घाटन असोसिएशन ऑफ ऑल इंडिया जीत कुने डो फाउंडेशन चे जनरल सेक्रेटरी ग्रँडमास्टर शंकरलाल गिहारा व दिल्लीतील प्रमुख मान्यवराच्या उपस्थित झाला याप्रसंगी सोलापूर चे ग्रॅन्ड मास्टर तथा ऑल इंडिया जीत कुने डो फाउंडेशन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष युवराज गायकवाड सर, मागास समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री सुभाष काका चव्हाण,किर्तीपाल गायकवाड,टेक्निकल डायरेक्टर मास्टर किशोर चंदनशिवे भास्कर देडे आनंद जाधव प्रल्हाद जाधव सोलापूर जिल्हाप्रमुख अभिजीत गायकवाड सम्राट गायकवाड, नागेश कांबळे, संदिप गायकवाड,लेडिज कोच वैभवी दळवी, किमया सपाटे,सुमित पाटील, आदी मान्यवर विद्यार्थी, पालक, प्रशिक्षक, मार्गदर्शक, उपस्थित होते.
या ऐतिहासिक यशात सोलापूर टीमच्या आपल्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट व देखणी कामगिरी करत महाराष्ट्र नांव उंचावल आहे.
ही कामगिरी संपूर्ण महाराष्ट्रासाठी, सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.

















