जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 मध्ये सर्वसाधारण 590 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 151 कोटी आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 4 कोटी 28 लाख निधी असा एकूण 745 कोटी 28 लाख इतका निधी मंजूर असून 20 डिसेंबर पर्यंत एकूण खर्च झालेला निधी 190 कोटी 11 लाख इतका आहे. हे प्रमाण कमी असून अर्थसंकल्प तरतुदीच्या 38.75 टक्के आहे. तरी सर्व शासकीय यंत्रणांनी समितीने मंजूर केलेला निधी शंभर टक्के खर्च करावा. हा निधी व्यपगत होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखाची राहील, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी खासदार सर्वश्री जयसिद्धेश्वर स्वामी, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, ओमप्रकाश राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल उगले- तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, सोलापूर शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हाधिकारी महसूल विठ्ठल उदमले, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहायक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 चा 20 डिसेंबर 2023 अखेर झालेल्या खर्च तर सन 2024-25 चा प्रारूप आराखडयाची माहिती बैठकीत सादर केली. सहायक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांनी आभार मानले.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...