Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

खेळता खेळता कॅमेऱ्याने दिली धडक; खेळाडू जखमी…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 28, 2022
in sports
0
खेळता खेळता कॅमेऱ्याने दिली धडक; खेळाडू जखमी…
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मेलबर्न इथे बॉक्सिंग डे टेस्ट सुरू आहे. दुसऱ्या दिवशी अंतिम सत्रात खेळ सुरू असताना हा विचित्र प्रकार घडला. दिवसभर भन्नाट वेगाने बॉलिंग करुन बॅट्समन्सला जेरीस आणणाऱ्या अँनरिक नॉर्कियाला चक्क स्पायडरकॅमने धडक दिली. नॉर्किया बॅकवर्ड स्क्वेअर या ठिकाणी फिल्डिंग करत होता. त्यावेळी फॉक्स स्पोर्ट्स चॅनेलचा फ्लाइंग फॉक्स कॅमेरा नॉर्कियावर जाऊन आदळला. या धक्क्यामुळे नॉर्किया खाली पडला. सुदैवाने तो लगेचच पुन्हा खेळण्यासाठी सज्ज झाला. “मला नेमकं काय येऊन लागलं मला खरंच कळलं नाही. तूर्तास मी बरा आहे. मी फिल्डिंग पोझिशनला जात असताना डाव्या खांद्यावर काहीतरी येऊन आदळलं. माझ्या कोपरालाही लागलं.

कोपराच्या जागी दुखत होतं. खांदा बरा आहे. मी स्पायडरकॅमच्या तारा पाहिल्या. वळायला गेलो, माझं डोकं बाजूला करायला गेलो तेव्हा मला कॅमेरा दिसला. पण असं करायला मला उशीरच झाला. अतिशय वेगात जे काही होतं ते माझ्यावर येऊन आदळलं. मला लागलं पण मी बॉलिंग करु शकलो. अचानक घडलेल्या या प्रकारानंतरही मी एकाग्रचित्ताने खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला”, असं दुखापतग्रस्त अँनरिक नॉर्कियाने सांगितलं. “हा कॅमेरा खूपच खालच्या बाजूने आहे यावर आम्ही बोललो होतो. ड्रिंक्स ब्रेकवेळी खेळाडूंशी बोलण्यासाठी कॅमेरा खाली येतो. पण एरव्ही तो इतक्या खाली असण्याची आवश्यकता नाही. आमच्या उंचीएवढ्या ठिकाणी तो असायला नको. असं माझं मत आहे. खेळाडूंची उंचीही लक्षात घ्यायला हवी. आमच्या संघात मार्को यान्सनची उंची सहा फूटांपेक्षा जास्त आहे. त्यालाही याचा फटका बसू शकतो”, असं नॉर्किया म्हणाला.

दरम्यान सामन्याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या फॉक्स स्पोर्ट्स कंपनीने या अपघातासाठी अँनरिक नॉर्कियाची माफी मागितली आहे. फॉक्स स्पोर्ट्सने ही ऑपरेटरची चूक असल्याचं मान्य केलं आहे.

या अपघातानंतर उर्वरित दिवसासाठी स्पायडरकॅम बंद ठेवण्यात आला. तिसऱ्या दिवशी स्पायडरकॅम सुरू असेल. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त काळजी घेण्यात येईल असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटलं आहे. स्पायडरकॅमचं नियंत्रण करणाऱ्या ऑपरेटरला टेस्टच्या उर्वरित दिवसांसाठी कामावरुन कमी केलं आहे.

  

स्पायडरकॅम काय असतो?

खेळाचं थेट प्रक्षेपण करण्यासाठी मैदानात विविध ठिकाणा कॅमेरे बसवलेले असतात. हे कॅमेरे स्टेडियमच्या विविध भागांमध्ये असतात. एकाच जागी स्थिर असे हे कॅमेरे कॅमेरामनद्वारे ऑपरेट केले जातात.खेळाचा थरार आणखी जवळून न्याहाळता यावा यासाठी टेलिव्हिजन कंपन्यांनी स्पायडरकॅम वापरणं सुरु केलं. हा कॅमेरा सतत फिरता असतो. मैदानात दोन दोरखंडांनी त्याला बांधलेलं असतं. मैदानात खेळ सुरु असताना डोक्यावरुन तो चित्रीकरण करतो.काही चॅनेल्स मैदानात ड्रिंक्स ब्रेक असताना या कॅमेऱ्याद्वारे एखाद्या खेळाडूची छोटी मुलाखतही घेतात. त्यावेळी हा कॅमेरा खाली येतो. या कॅमेऱ्याला माईकही अटॅच केलेला असतो. बॅट्समनने मारलेला फटका बाऊंड्रीपार कसा गेला हे बारकाईने हा कॅमेरा टिपतो.

एखादा कॅच घेण्यासाठी किंवा बॉल अडवण्यासाठी फिल्डरने घेतलेली मेहनतही तो शिताफीने टिपतो. मैदानातला एक खेळाडूच बनून हा कॅमेरा चित्रीकरण करतो.मैदानात सतत फिरता असल्याने ऑपरेटरद्वारे हा कॅमेरा चालवला जातो.मैदानातल्या खेळाचा अंदाज घेत रिमोट अक्सेनने याचं कामकाज चालतं.

Post Views: 150
Previous Post

अनिल देशमुखांच्या सुटकेवर सुप्रिया सुळे म्हणतात ‘सत्यमेव जयते’

Next Post

LIVE : नागपूर विधिमंडळ परिसरातून उद्योग मंत्री उदय सामंत लाईव्ह…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
LIVE : नागपूर विधिमंडळ परिसरातून उद्योग मंत्री उदय सामंत लाईव्ह…

LIVE : नागपूर विधिमंडळ परिसरातून उद्योग मंत्री उदय सामंत लाईव्ह...

ताज्या बातम्या

आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा अपघात #solapurnews #marathinews #viral

May 30, 2026

रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल #solapurnews #news

May 30, 2026

नालेसफाई महागात नगरअभियंताची वेतनवाढ रोखली झोन अधिकारी निलंबित #solapurnews #viral

May 30, 2026

जरांगे पाटलांच्या उपोषणावर बोलले मुख्यमंत्री #marathinews #news

May 30, 2026

परत हुतात्मा एक्सप्रेस सहा तास पुण्यातच स्टेशनवर रखडली प्रवाशांची गैरसोय #solapurnews #news

May 30, 2026

*सावधान विचलित करणारे दृष्य *जुन्या वादातून सहा जणांचा खून

May 30, 2026

पुण्यात जनगणना करताना शिपाई महिलेला बेदम मारहाण #viral #news #marathinews

May 30, 2026
“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886644

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697