Thursday, March 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बैठकीत मंत्री एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा राऊतांचा दावा; हसन मुश्रीफ म्हणाले, बैठकीत फक्त इतकंच घडलं की…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 9, 2023
in maharashtra
0
बैठकीत मंत्री एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा राऊतांचा दावा; हसन मुश्रीफ म्हणाले, बैठकीत फक्त इतकंच घडलं की…
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याची गुरुवारी घोषणा केली. त्यानुसार मनोज जरांगे राज्यभरात पुन्हा दौरे करणार आहेत. मराठा Vs ओबीसी वाद तापणार ?

 

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केल्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्येच दोन तट पडले असून काहीसा सुप्त तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत दोन मंत्री एकमेकांवर धावून गेल्याचा दावा केला आहे. आपल्याला ही माहिती बाहेरुन मिळाल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राऊत यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. संजय राऊत निखालसं खोटं बोलत आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत असा कोणताही वाद झाला नाही. संजय राऊत देत असलेली माहिती चुकीची आहे. फक्त आपल्याला सामंजस्याने वागायचे आहे, मराठा आरक्षणाच्या विषयावर सर्व मंत्र्यांनी संयमाने बोलावे, फक्त एवढीच सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्याशिवाय, बैठकीत कोणताही वाद झाला नाही. संजय राऊत यांनी ही गोष्ट सिद्ध करुन दाखवली तर आम्ही मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

 

मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची तयारी दाखवली होती. मात्र, मनोज जरांगे पाटील हे वारंवार मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण द्या, अशी मागणी करत आहेत. या मागणीला छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी संघटनांच्या नेत्यांनी विरोध केला आहे. छगन भुजबळ यांनी उघडपणे सर सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध केल्याने सरकार अडचणीत सापडले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर थेट निशाणा साधला नसला तरी अप्रत्यक्ष संदेश दिला होता. कोणत्याही नेत्याने ओबीसी किंवा मराठा समाजात संशयाची बीजे पेरण्याचे काम करु नये, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसी किंवा अन्य कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले होते.

 

तर दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर दिले होते. छगन भुजबळ यांचं वक्तव्य १०० टक्के अयोग्य आहे. मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या हक्कांवर गदा येणार नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या गोष्टींवर चर्चा झाली होती. तरीही छगन भुजबळ अशाप्रकारे बोलत आहेत, हे आश्चर्यकारक आहे. छगन भुजबळ लोकांची दिशाभूल करुन संभ्रम पसरवत आहेत. छगन भुजबळ यांना ओबीसींचा तारणहार अशी प्रतिमा निर्माण करायची आहे. अशाप्रकारची सनसनाटी वक्तव्यं करणं ही त्यांची जुनी सवय आहे, अशी टीका शंभुराज देसाई यांनी केली होती.

 

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होत. त्यांनी म्हटले की, मराठा विरुद्ध ओबीसी मुद्द्यावरुन मंत्रिमंडळाच्या बैठकीत गँगवॉर सुरु आहे. मला तर वाटतं एखादा मंत्री बैठकीत मार खाईल, असं वातावरण आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री एकमेकांच्या अंगावर धावून जातात. यापूर्वी राज्यात कधीच अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं या सगळ्यावर कोणतही नियंत्रण नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Post Views: 115
Previous Post

अमरावती : विद्यार्थ्याचा प्राध्यापकावर चाकू हल्ला

Next Post

मुंबई मनपा आणि बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात; २६ हजार बोनस दिल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मुंबई मनपा आणि बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात; २६ हजार बोनस दिल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई मनपा आणि बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात; २६ हजार बोनस दिल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

ताज्या बातम्या

अमर सुरवसे यांचे IBPS परीक्षेत यश; कृषी अधिकारी पदासाठी निवड.

March 5, 2026

भाषा अस्तित्वात राहिली तरच समाज आणि संस्कृतीही टिकून राहील : प्रा. नानासाहेब गव्हाणे

March 5, 2026

करजगी एमएसईबी येथील सुरक्षा गार्ड माजी सैनिक श्रीकांत मोरे सेवानिवृत्त

March 5, 2026

अभिनंदन प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न 

March 5, 2026

मध्य रेल्वेच्यावतीने ‘सेवा संकल्प ठराव’

March 5, 2026

‘जेएनयू’च्या कुलगुरूंची हकालपट्टी करा!

March 5, 2026

ए.जी. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे एन पी टी ई एल परीक्षेत घवघवीत यश

March 5, 2026

ग्रहण स्पर्शानंतर देवाला चंद्रभागेच्या पाण्याने स्नाननैवेद्यात बदल

March 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0715925

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697