Sunday, June 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोमवारीपासून 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटीचा मोफत प्रवास

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 11, 2023
in maharashtra
0
सोमवारीपासून 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटीचा मोफत प्रवास
0
SHARES
157
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणारे शहर ही नवी मुंबईची ओळख असून आता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असलेल्या 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटी बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा 13 नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे जाहीर करीत नवी मुंबईकर ज्येष्ठांना दिवाळी भेट देण्यात आलेली आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने नुकतेच तसे जाहीर करण्यात आले असून ज्येष्ठ नागरिकांना आणखी एक दिलासा मिळालेला आहे.

नवी मुंबईकर प्रवाशांना समाधानकारक सेवा पुरविणारा उपक्रम म्हणून नवी मुंबईकरांची नेहमीच एनएमएमटी प्रवासाला पसंती लाभली असून नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या ताफ्यातील 205 डिझेलवर चालणा-या, 85 सी.एन.जी. वर चालणा-या तसेच 56 वातानुकूलीत व्होल्वो आणि 195 वातानुकूलीत इलेक्ट्रीक अशा एकूण 541 बसेस आहेत.

 

नमुंमपा परिवहन उपक्रमामार्फत नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत व हद्दीबाहेर मुंबई, बोरिवली, ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल, खोपोली, कर्जत, रसायनी आणि उरण या भागात 43 सर्वसाधारण व 32 वातानुकुलीत अशा एकूण 75 बस मार्गांवर प्रवाशी सेवा देण्यात येत आहे.

 

 

सद्यस्थितीत परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा आदर करीत त्यांना बस प्रवास शुल्कात 50% सवलत दिली जात आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत (एसटी) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना 17 मार्चपासून बसमध्ये मोफत प्रवासाची सवलत देण्यात येत आहे.

 

त्याच धर्तीवर नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसमध्ये वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सुध्दा मोफत प्रवासाची सवलत देण्यात यावी अशी मागणी नमुंमपा क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक व लोकप्रतिनिधी यांचेकडून सातत्याने केली जात होती.

 

याबाबत सकारात्मक विचार करून नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर 13 नोव्हेंबरपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असणा-या 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या एनएमएमटी बसचा प्रवास मोफत असेल असे जाहीर केले आहे.

 

हा प्रवास करण्यासाठी 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी नमुंमपा परिवहन उपक्रमाचे ओळखपत्र प्राप्त करून घेणे गरजेचे राहील. ओळखपत्राकरिता वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्याचा पुरावा म्हणून जन्म तारखेचा दाखला अथवा पूर्ण जन्मतारीख नमूद असलेले आधार कार्ड सादर करणे आवश्यक असेल. तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवास पुरावा म्हणून मालमत्ताकर त्या ज्येष्ठ नागरिकाच्या स्वत:च्या कुटुंबाच्या व्यक्तीच्या नावावर असलेले कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील. भाडेपट्टीवर राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांनी घराचा करारनामा (Agreement Copy) किंवा नवी मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये किमान 05 वर्षे रहिवाशी असल्याचा तहसिलदाराचा दाखला सादर करणे आवश्यक असेल. अशा सर्व कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असलेल्या 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना परिवहन उपक्रमाचे ओळखपत्र प्राप्त करून घेता येईल. त्याकरिता कागदपत्राच्या मूळ व दोन छायांकीत प्रती तसेच पासपोर्ट आकारचे तीन फोटो सादर करणे आवश्यक राहील.

 

ज्येष्ठ नागरिकांप्रती असलेली आपुलकीची आणि आदराची भावना अभिव्यक्त करीत ऐन दिवाळीमध्ये 65 वर्षावरील नवी मुंबईकर ज्येष्ठ नागरिकांना मोफत एनएमएमटी प्रवासाची दिवाळी भेट देण्याचा घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय महापालिकेची लोककल्याणकारी प्रतिमा उजळविणारी असून या निर्णयाबद्दल आयुक्त राजेश नार्वेकर आणि नमुंमपा परिवहन उपक्रमाचे ज्येष्ठ नागरिकांसह सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

Post Views: 192
Previous Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परिक्षांचे वेळापत्रक जाहीर

Next Post

कोरोना काळातील रद्द विमान तिकीटांचा परतावा मिळणार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
कोरोना काळातील रद्द विमान तिकीटांचा परतावा मिळणार

कोरोना काळातील रद्द विमान तिकीटांचा परतावा मिळणार

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील वाढत्या सायबर गुन्ह्यांवर लगाम घाला

महाराष्ट्रातील वाढत्या सायबर गुन्ह्यांवर लगाम घाला

June 21, 2026

सर्वधर्मीय अविवाहित तरुण व तरुणींसाठी वधू वर सूचक मेळावा

June 21, 2026
पारधी समाजाच्यावतीने एम.ए.सी.बी. चे प्रमुख औंडीकर यांचा सत्कार

पारधी समाजाच्यावतीने एम.ए.सी.बी. चे प्रमुख औंडीकर यांचा सत्कार

June 21, 2026
गांधी नाथा रंगजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

गांधी नाथा रंगजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

June 21, 2026

राज्यसेवेत २६५ पदांची मेगाभरती; पण उपजिल्हाधिकारी पदाचा अद्याप पत्ता नाही!

June 21, 2026

लग्नाचे आमिषाने 21 वर्षीय तरुणीवर सतत लैंगिक अत्याचार

June 21, 2026

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये 21 जून अर्थात 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
पदमनगर बास्केटबॉल अकॅडमीच्या वतीने आंतरर्राष्ट्रीय योग दिन  साजरा

पदमनगर बास्केटबॉल अकॅडमीच्या वतीने आंतरर्राष्ट्रीय योग दिन  साजरा

June 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0926596

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697