यंदा राज्यात अनेक जिल्ह्यांत पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती ओढवली आहे. मंत्रिमंडळ उपसमिती आता वेगवेगळ्या निकषांवर आधारित मंडल स्तरावर जात आहे. लवकरच दुष्काळी मंडलांचीही घोषणा होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कुलाबा येथील ‘पालावारची दिवाळी’ या कार्यक्रमावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी नुकतीच ही माहिती दिली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
केंद्राच्या निकषानुसार, राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. यावरून झालेल्या टीकेनंतर मंत्रिमंडळ बैठकीत ९०० मंडल निहाय दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.