Thursday, May 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘या कुटुंबावर जवळच्यांनी घाव केले…’, रश्मी-उद्धव ठाकरेंविषयी लिहिताना किरण माने भावुक

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 8, 2024
in political
0
‘या कुटुंबावर जवळच्यांनी घाव केले…’, रश्मी-उद्धव ठाकरेंविषयी लिहिताना किरण माने भावुक
0
SHARES
110
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 अभिनेते किरण माने यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला, यानंतर त्यांनी केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे.

 

‘मुलगी झाली हो’, ‘बिग बॉस मराठी ४’ फेम अभिनेते किरण माने सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. माने यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. ७ जानेवारी रोजी त्यांना उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधलं. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटातील इतर नेतेमंडळींच्या उपस्थितीत किरण यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी असे म्हटले की कोणत्याही राजकीय हेतूने त्यांनी पक्षप्रवेश केलेला नाही. दरम्यान शिवबंधन बांधल्यानंतर त्यांनी एक फेसबुक पोस्टही शेअर केली. शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, मातोश्रीवरील अनुभव आणि प्रवेशामागील कारणं सांगणारी ही पोस्ट आहे.

 

 

वाचा किरण माने यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी

“”…किरणजी, तुमचे लेख मी वाचलेत. फार छान लिहीता. उद्धवजी येतील थोड्या वेळात, तुम्ही आधी नाष्टा-चहा करून घ्या. रिलॅक्स व्हा. हे तुमचंच घर आहे.” रश्मी वहिनींनी स्वागतच असं केलं की, ‘मातोश्री’ विषयी मी काॅलेज जीवनापास्नं ऐकलेल्या अनेक गोष्टी झरझरझरझर डोळ्यांसमोरून जाऊ लागल्या. अमिताभ बच्चनपासून दादा कोंडके, नाना पाटेकरांपर्यंत अनेकांनी मीनाताई ठाकरेंच्या आदरातिथ्याबद्दल भरभरुन सांगितलेल्या अनेक गोष्टी माझ्या मेंदूत कोरलेल्या आहेत. अगदी तसंच आदरातिथ्य रश्मी वहिनी करत होत्या. आम्ही भरभरुन गप्पा मारल्या. मी विचार करत होतो, गेल्या दोन तीन वर्षांत हे कुटूंब अनेक जीवघेण्या आघातांमधनं गेलंय. जवळच्यांनी, रोज या घरात वावरणाऱ्यांनी केलेले ते घाव अजूनही ओले आहेत. वेदना होत असणार. तरीही या माऊलीच्या चेहऱ्यावरचं हास्य जराही मावळलेलं नाही. सगळं दु:ख पचवून चेहरा प्रसन्न ठेवायला जिगरा लागतो. माझ्या डोळ्यांत पाणी तरळलं.

.

 

गेली चार दशकं ‘मातोश्री’ या वास्तूचं आकर्षण अख्ख्या महाराष्ट्राला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला ‘मातोश्री’ हा अजिंक्यतारा आहे, हे विरोधकही नाकारणार नाहीत! मुंबईत भले कितीही उंच टाॅवर्स उभे राहोत, ‘मातोश्री’पुढे सगळं खुजं आहे. मला बहिणीसारख्या असलेल्या सुषमा अंधारेताईंनी ‘मातोश्री’वर बोलावले तेव्हापासून काळीज धडधडायला लागलं होतं! सुषमाताई म्हणजे मायेची सावली. दोन वर्षांपूर्वी माझ्यावर जो मोठा आघात झाला होता, तेव्हा ओळख नसतानाही स्वत:हून फोन करुन भेटून, मला न्याय मिळावा म्हणून माझ्यासाठी जीवाचं रान केलेले जे दोनचार लोक होते, त्यांपैकी एक सुषमाताई. त्याविषयी सविस्तर लिहीन नंतर. पण त्या सोबत असल्यामुळे एक दिलासा होता.

 

 

उद्धवजी आले. सोफ्यात बसले. मनात आलं, इथेच कधीकाळी बाळासाहेब ठाकरे बसत असतील! ‘कधी आलात किरणजी?’ उद्धवजींच्या प्रश्नानं भानावर आलो. चर्चा सुरू झाली. मी मुद्दाम ठरवून प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारधारेचा विषय काढला. त्यावर उद्धवजी इतके सविस्तर बोलले की मी अवाक झालो. त्यांच्या विचारांचा सगळा अर्क उद्धवजींच्या नसानसात आहे, हे जाणवलं. प्रबोधनकारांची शाहू महाराज आणि डाॅ. आंबेडकरांसोबतची एक दादरच्या गणेशोत्सवातली आठवण जेव्हा उद्धवजींनी सांगितली. तेव्हा मनाशी म्हटलं, ये वजह है के ये बंदा अभी भी डटकर खडा है! काही वेळा राजकारणात काही गोष्टींत तडजोडी कराव्या लागतात. त्या पूर्वी त्यांनी केल्याही असतील, पण आता संविधान पोखरून समोर जो विषमतेचा, अन्यायाचा, अराजकाचा दहशतीचा अक्राळविक्राळ राक्षस उभा राहिला आहे, त्याची पुरेपुर जाणीव असलेले देशात जे आठदहा नेते उरले आहेत, त्यातले एक उद्धवजी ठाकरे आहेत, हे नक्की!

 

 

बास. आणखी काय पायजे? आता एक होऊन लढायचं. बाकी बारीकसारीक मतभेद सगळीकडेच रहाणार. शत्रू फिक्स झाला ना? विषय कट. बाकी सविस्तर बोलत राहीन. पण फिकीर करू नका भावांनो, ह्यो सातारी वाघ मागं हटनार नाय. आपली विचारधारा ह्यो आपला ‘नाद’ हाय. त्यो कुटं जात न्हाय. शिवसेना आपलीशी केलीय. आता उतनार नाय, मातनार नाय, घेतला वसा टाकनार नाय. जय शिवराय! जय भीम! जय महाराष्ट्र! – किरण माने.”

ही पोस्ट करताना माने यांनी ‘मातोश्री’वर असणाऱ्या बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या एका फोटोफ्रेमसोबतचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे.

Post Views: 71
Previous Post

संपूर्णस्वच्छतामोहीम ला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

धक्कादायक! सलमान खानच्या फार्महाउसमध्ये दोन अज्ञात व्यक्तींची घुसखोरी; तारेचं कंपाउंड तोडून आत जाण्याचा प्रयत्न

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
धक्कादायक! सलमान खानच्या फार्महाउसमध्ये दोन अज्ञात व्यक्तींची घुसखोरी; तारेचं कंपाउंड तोडून आत जाण्याचा प्रयत्न

धक्कादायक! सलमान खानच्या फार्महाउसमध्ये दोन अज्ञात व्यक्तींची घुसखोरी; तारेचं कंपाउंड तोडून आत जाण्याचा प्रयत्न

ताज्या बातम्या

लसीकरण टाळू नका #marathinews

May 21, 2026

जिल्ह्यात इंधनसाठा आहे काळजी करू नका #viral #maharashtranews

May 21, 2026

पेट्रोलबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 21, 2026

सभापती चाकोतेंनी डेन्मार्कमधून मोदींच्या चाहत्यांची क्लिप व्हायरल केली #viral

May 21, 2026

माझ्या लेकराला वाचवा हो म्हणत आईने फोडला टाहो #solapurnews #viral

May 21, 2026

एलपीजीला पार्याय ; बालाजी अमाईन्सचे डायमिथाईल इथर निर्मितीत पाहिले पाऊल #solapurnews #marathinews

May 21, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या ३० मे पासून सुरू होणाऱ्या प्राणांतिक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माळशिरस तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव जाणार

May 20, 2026
स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या ‘त्या’ समाजसेवकाचा अनोखा सत्कार!

स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या ‘त्या’ समाजसेवकाचा अनोखा सत्कार!

May 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0873639

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697