Sunday, July 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

टिप्परने धडक दिली, छोटा हत्तीमधून नोटांचे बंडल रस्त्यावर पडले; पोलिसांनी जप्त केले 7 कोटी रुपये

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 11, 2024
in solapur
0
टिप्परने धडक दिली, छोटा हत्तीमधून नोटांचे बंडल रस्त्यावर पडले; पोलिसांनी जप्त केले 7 कोटी रुपये
0
SHARES
181
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हैदराबाद : लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सध्या पैसा आणि अवैध मद्याचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. यापूर्वी ईडी सीबीआयच्या धाडीत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली जात होती. मात्र, निवडणूक काळात पोलिसांच्या नाकाबंदी आणि प्रचार यंत्रणेदरम्यान होत असलेल्या तपासातही रोकड आढळून येत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी मतदारांना वाटण्यासाठी किंवा इतर कामासाठी वापरण्यात येत असलेली अवैध रोकड जप्त करण्यात आली आहे. आता, आंध्र प्रदेशातही 7 कोटी रुपयांची रोकड पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे.

आंध्र प्रदेशमध्ये शनिवारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. कारण, शुक्रवारीच एनटीआर जिल्ह्यात 8 कोटी रुपये पोलिसांकडून जप्त करण्यात आले होते. आता, राज्यातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये लपवून 7 कोटी रुपये नेण्यात येत होते. टाटा एस या छोटा हत्ती वाहनातून ही रक्कम नेली जात होती. मात्र, नल्लाजर्ला मंडलातील अनंतपल्ली येथे एका ट्रॅक्टर ट्रॉलीसोबत छोटा हत्तीची धडक झाली. या धडकेमुळे छोटा हत्तीमधून नेण्यात येत असलेले बॉक्स खाली पडले, मात्र ह्या बॉक्समधून चक्क नोटांचे बंडलच रस्त्यावर पडल्याचं दिसून आलं.

छोटा हत्ती वाहनात ठेवण्यात आलेल्या पोत्यांमध्ये काही पुठ्ठयांचे बॉक्स होते, ज्यामध्ये रोकड ठेवण्यात आली होती. मात्र, दोन वाहनांची धडक झाल्यानंतर बॉक्समधील रक्कम रस्त्यावर पडल्याचा पाहताच स्थानिकांनी तत्काळ पोलीस स्टेशनला माहिती दिली. विजयवाडा येथून हे वाहन विशाखापट्टणमकडे जात असताना ही अपघाताची घटना घडली. या अपघातात छोटा हत्ती वाहनातील चालक जखमी झाला असून त्यास गोपालपूरम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

एनटीआर जिल्ह्यातही 8 कोटी जप्त
दरम्यान, शुक्रवारीही आंध्र प्रदेशच्या एनटीआर जिल्ह्यात 8 कोटी रुपयांची रोकड आढळून आली होती. पोलिसांनी नाकाबंदी तपासात पाईपने भरलेल्या ट्रकमधून नेण्यात येणारी ही रक्कम जप्त केली. पोलिसांनी ट्रकसह, रोकड जप्त करत दोघांना ताब्यातही घेतलं आहे.

25 जागांवर चौथ्या टप्प्यात मतदान
दरम्यान, आंध्र प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यात लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होत आहे. राज्यातील 25 लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे, निवडणूक अधिकारी व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर काम करत आहेत. अराकू, श्रीकाकुलम, विजयनगरम, विशाखापट्टनम, अनकापल्ली, काकिनाड़ा, अमलापुरम, राजमुंदरी, नरसापुरम, एलुरु, मछलीपट्टनम, विजयवाड़ा, गुंटूर, नरसारावपेट, बापटला, ओंगोल, नांदयाल, कर्नूलु, अनंतपुर, हिंदूपुर, कडपा, नेल्लोर, तिरुपति (आरक्षित), राजमपेट आणि चित्तूर मतदारसंघात मतदान होणार आहे.

Post Views: 82
Previous Post

पुष्पाची सिरीज येणार, धनंजय मुंडेंचा चंदनावरुन बजरंग सोनवणेंवर हल्ला, पवारांना म्हणाले, मराठा आरक्षणावर बोला

Next Post

राज ठाकरे म्हणाले, दादांनी कधी जातीचं राजकारण केलं नाही, आता अजित पवार म्हणतात…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
राज ठाकरे म्हणाले, दादांनी कधी जातीचं राजकारण केलं नाही, आता अजित पवार म्हणतात…

राज ठाकरे म्हणाले, दादांनी कधी जातीचं राजकारण केलं नाही, आता अजित पवार म्हणतात...

ताज्या बातम्या

सल्ल्याला मदत करण्याची भूमिका केवळ माणुसकी मंत्री उदय सामंत #viral #news #marathinews

July 12, 2026

यशवंतपूर बिकानेर एक्स्प्रेसवर दरोडा ; प्रवाशांना लुटून केली मारहाण #viral #marathinews #solapurnews

July 12, 2026

विमानतळावर दृश्यमानतेची समस्या नाही #viral #marathinews #solapurnews

July 12, 2026

आदिला नदी परिसरातील घरे पाडणार नाहीत पालकमंत्री जयकुमार गोरे #viral #marathinews #solapurnews

July 12, 2026

मला भाजपात काहीही रस नाही एकनाथ खडसे

July 12, 2026

वेगाने व्हायरल होतोय मानवी मनोरा #viral

July 12, 2026

पडळकर यांच्या कडक शब्दाने जयंत पाटलांना दुखावलं #viral #news

July 12, 2026

माऊलींची पालखी दिवे घाटात आली तो मनोहारी क्षण #viral #news#maharashtranews

July 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0972435

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!