Saturday, October 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नगरला ग्रामीण मतदारांनी वाढविला मतटक्का, कोणाचा फायदा कोणाला फटका ?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 15, 2024
in maharashtra
0
नगरला ग्रामीण मतदारांनी वाढविला मतटक्का, कोणाचा फायदा कोणाला फटका ?
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात यावेळी मतदानाचा टक्का किचिंत वाढला आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक उत्साह असल्याचे पाहायला मिळाले. निवडणूक आयोगाने मतदान वाढविण्यासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांसोबत ग्रामीण भागातील राजकीय चढाओढ, मधल्या काळात न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही कारणेही मतदान वाढीमागे असल्याचे सांगण्यात येते. आता यावरून निकालाचे अंदाज बांधले जाऊ लागले आहे. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. त्यामुळे आता मतदानाच्या आकडेवारीवरून विजयाची गणिते मांडली जाऊ लागली आहेत. तर दुसरीकडे प्रशासनाकडून अनेकदा सुधारित आकडेवारी जाहीर केली जात असताना टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून येत असल्याने त्याचीही चर्चा सुरू झाली आहे.

गेल्यावेळी म्हणजे २०१९ ला अहमदनगर मतदारसंघात ६४.७९ टक्के मतदान झाले होते. यावेळी ते ६६.६१ टक्के मतदान झाले. गेल्यावेळी शिर्डीत ६४.५४ टक्के मतदान झाले होते. यावेळी ६३.०३ टक्के मतदान झाले आहे. यावर्षी नगर शहर विधानसभा मतदार संघात सर्वात कमी म्हणजे ६२.५० टक्के मतदान झाले. तर सर्वाधिक ७०.१३ टक्के मतदान पारनेरला झाले. शेवगावला ६३.०३ टक्के, राहुरीला ७० टक्के, श्रीगोंद्याला ६७.९० टक्के आणि कर्जत जामखेडला ६६.१९ टक्के मतदान झाले. या मतदार संघात १९ लाख ८१ हजार ८६६ एकूण मतदार होते. यापैकी १३ लाख, २० हजार, १६८ मतदारांनी मतदान केले आहे. ६९.८३ टक्के पुरुषांनी तर ६३.११ टक्के महिलांनी मतदानात भाग घेतला आहे. नगर शहरात मुस्लिम आणि अल्पसंख्याक भागात मोठ्या प्रमाणावर मतदान झाले आहे. यापूर्वी या भागात एवढ्या मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडल्याचे पाहिले नसल्याचे लोक सांगतात.

 

आता यावरून विजयाची गणिते मांडली जाऊ लागली आहेत. एकूण मतदानासोबतच कोणत्या विधानसभा क्षेत्रात किती मतदान झाले, यावरून गणिते मांडली जात आहेत. गेल्यावेळी महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना ७ लाख, ४ हजार ६६० मते मिळाली होती, तर राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांना ४ लाख, २३ हजार, १८६ मते मिळाली होती. विखे २ लाख, ८१ हजार ५२६ मतांनी विजयी झाले होते. त्यांना ५८.५४ टक्के मते मिळाली होती. त्यावेळी १२ लाख, ६ हजार मतदान झाले होते. २०१४ मध्ये भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांना ६ लाख, ५ हजार १८५ मते मिळाली होती, तर राष्ट्रवादीचे राजीव राजळे यांना ३ लाख, ९६ हजार मते मिळाली होती. गांधी यांना ५६ टक्के मिळाली होती.

 

अर्थात यावेळी राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहे, एवढेच नव्हे तर उलटी पालटीही झाली आहेत. यावेळी विखे यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे नीलेश लंके यांनी निवडणूक लढविली. ते लोकसभा निवडणुकीला प्रथमत: सामोरे जात आहेत. २०१९ मध्ये पारनेर विधानसभा मतदारसंघातून ते १ लाख ३९ हजार ९६३ म्हणजे ६१.७ टक्के मते घेऊन विजयी झाले होते.

 

शिर्डीतही गणित अवघड

यावेळी शिर्डीत तिरंगी लढत झाली. त्यामुळे तेथील निकाल मत विभाजनावर ठरण्याची चिन्हे आहेत. महायुतीचे सदाशिव लोखंडे आणि महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासोबतच वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते रिंगणात होत्या. त्यामुळे रुपवते यांना मिळणारी मते पक्षाच्या आधारे, जातीच्या आधारे की विरोधी दोघांवरील नाराजीच्या आधारे कशी आणि किती वळतात, त्यावर विजयाचे गणित अवलंबून आहे.

Post Views: 86
Previous Post

मान सन्मान नसेल पदाचा फायदा काय? मोदींच्या सभेत स्थान न मिळाल्यानं शिंदेंच्या जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

Next Post

शिंदे-ठाकरे एकत्र येणार नाहीत, पण ठाकरेंची सेना काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकते : गिरीश महाजन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
शिंदे-ठाकरे एकत्र येणार नाहीत, पण ठाकरेंची सेना काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकते : गिरीश महाजन

शिंदे-ठाकरे एकत्र येणार नाहीत, पण ठाकरेंची सेना काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकते : गिरीश महाजन

ताज्या बातम्या

पिके करपली, जमिनीला भेगा; दुष्काळग्रस्त गावांचा आमदार आवताडेंकडून पाहणी दौरा

October 2, 2026

चारा डेपो किंवा छावणीऐवजी थेट अनुदानाची मागणी; शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली व्यथा

October 2, 2026
तालुकास्तरिय क्रीडा स्पर्धेत राजेश्वर विद्यालय राजुरी अव्वल

तालुकास्तरिय क्रीडा स्पर्धेत राजेश्वर विद्यालय राजुरी अव्वल

October 2, 2026
महापालिकेत दोन सहाय्यक आयुक्तांच्या खात्यांत फेरबदल

महापालिकेत दोन सहाय्यक आयुक्तांच्या खात्यांत फेरबदल

October 2, 2026

सोलापूर महापालिकेतर्फे आरोग्य व भौतिकोपचार शिबिर

October 2, 2026
‘खेळ धोतराचा आणि विजारीचा’ ; ज्येष्ठांच्या खेळाने जिंकली ग्रामस्थांची मने

‘खेळ धोतराचा आणि विजारीचा’ ; ज्येष्ठांच्या खेळाने जिंकली ग्रामस्थांची मने

October 2, 2026
‘चलो दिल्ली’चा नारा; अकलूजहून शेतकऱ्यांच्या गाड्या दिल्लीकडे रवाना!

‘चलो दिल्ली’चा नारा; अकलूजहून शेतकऱ्यांच्या गाड्या दिल्लीकडे रवाना!

October 2, 2026
बीसीसीआयच्या १९ वर्षांखालील महिला टी-२० स्पर्धेसाठी सोलापूरच्या दोघींची निवड 

बीसीसीआयच्या १९ वर्षांखालील महिला टी-२० स्पर्धेसाठी सोलापूरच्या दोघींची निवड 

October 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1294155

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!