Saturday, March 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जळगावमध्ये उन्हाचा कहर; 100 मेंढ्या दगावल्या… मेंढपाळ कुटुंबीयांना मदत करण्याचे आवाहन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 25, 2024
in maharashtra
0
जळगावमध्ये उन्हाचा कहर; 100 मेंढ्या दगावल्या… मेंढपाळ कुटुंबीयांना मदत करण्याचे आवाहन
0
SHARES
44
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

यंदाच्या हंगामातील मान्सनपूर्व उन्हाळ्यामुळे अंगाची लाही-लाही होत असून देशातील सर्वाधिक तापमानाची  नोंद राजस्थानमध्ये झाली आहे. राजस्थानच्या बिकानेरमध्ये 49 अंश सेल्सियपर्यंत तापमान पोहोचलं आहे. तर, महाराष्ट्रातील विदर्भ आणि खान्देशात उन्हाचे चांगलेच चटके बसत आहेत. जळगावमध्ये  काल उन्हाच्या तडाख्यात वाहतूक करणाऱ्या ट्रकलाच एका भीषण आग लागल्याचे दिसून आले होते. आता, उन्हाच्या कडक प्रहारामुळे मुक्या पशुधनास जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तापमानाने उच्चांक गाठला असून 47 अंशांवर तापमान पोहोचले आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान सध्या विदर्भ व खान्देशात पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून तापमानाचा पारा 47 अंश सेल्सियसवर जाऊन पोहोचला आहे. या वाढत्या तापमानाचा फटका केवळ माणसांना, शेतातील पिकांनाच बसतो असे नाही. तर, मुक्या जीवांना देखील कडक उन्हाळ्याचा त्रास होत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताई नगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा गावात मेंढपाळ कुटुंबीयांच्या 100 हून अधिक मेंढ्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. या खळबळजनक घटनेची सध्या जिल्ह्यात चर्चा असून उन्हामुळे नागरिकही घराबाहेर पडत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, उष्माघातामुळे मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.

आमदार पाटील यांनी दिली भेट
जळगावीमधील मेंढ्या दगावल्याच्या घटनेनंतर आ. चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच, नुकसानग्रस्त मेंढपाळ कुटुंबीयांना मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केले आहे. तसेच, स्थानिक पशू चिकित्सक यांनी या मेंढ्यांचे शवविच्छेदन केले असून उष्मा घातामुळेच मेंढ्या मरण पावल्याचे निदान त्यांच्या अहवालातून समोर आले आहे.

उन्हामुळे ट्रकनेच घेतला पेट
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात भवानी माथाजवळ जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर अचानक एका ट्रकने पेट घेतल्याची घटना घडली. या ट्रकमधून गव्हाच्या पोत्यांची वाहूतक करण्यात येत होती. गव्हाच्या पोत्यांनी भरलेल्या या ट्रकला आग लागल्यामुळे येथील उन्हाची तीव्रता लक्षात येईल. दरम्यान, या घटनेनंतर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. मात्र, अग्निशमनचे बंब येईपर्यंत ट्रकचे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आल्याचं बोलंलं जात आहे. त्यामुळे, नागरिकांनी दुपारच्या प्रहरात अनावश्यक घराबाहेर न पडण्याचा सल्लाही जाणकारांकडून देण्यात येत आहे.

Post Views: 17
Previous Post

बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी मोक्का आणि तडीपार असलेल्या आरोपीला पिस्टलसह अटक केली.

Next Post

दहावीचा निकाल 27 मे रोजी ! mahresult.nic या वेबसाईटवर उपलब्ध निकाल…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
दहावीचा निकाल 27 मे रोजी ! mahresult.nic या वेबसाईटवर उपलब्ध निकाल…

दहावीचा निकाल 27 मे रोजी ! mahresult.nic या वेबसाईटवर उपलब्ध निकाल...

ताज्या बातम्या

यासाठी बोर्ड परीक्षा काळात स्ट्रॉगरूम पोलिस स्टेशनमध्ये असावी,

March 21, 2026

श्रीराम नवमीच्या निमित्ताने कर्णिक गर येथे प्रभू श्रीरामाच्या ५१ मूर्तीचे वाटप

March 21, 2026

सोलापूर शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

March 21, 2026

पानगावमध्ये माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

March 21, 2026

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असलेल्या जनगणनेच्या तयारीला वेग आला आहे. जिल्

March 21, 2026

रूपाली चाकणकर यांनी दिला अखेर महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनामा

March 21, 2026

अखेर महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनामा

March 20, 2026

20 March 2026

March 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0755606

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697