Thursday, June 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात ‘दोस्तीत कुस्ती’, जिवाभावाचे मित्र एकमेकांना भिडले

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 12, 2023
in maharashtra
0
महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात ‘दोस्तीत कुस्ती’, जिवाभावाचे मित्र एकमेकांना भिडले
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सध्या ६५व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगला आहे. अनेक माजी विजेते आणि अव्वल दर्जाचे मल्ल या अटीतटीच्या स्पर्धेत उतरले आहे. ही स्पर्धा १० ते १४ जानेवारी दरम्यान होत आहे. या स्पर्धेत झालेल्या एका कुस्तीत जिवाभावाचे दोन मित्र आमनेसामने होते. ही कुस्ती ज्ञानेश्वर जामदाडे आणि सिकंदर शेख यांच्यात रंगली होती.

पुण्यातील कुस्ती महर्षी स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत माऊली उर्फ ज्ञानेश्वर जामदाडेला पराभवाचा धक्का बसला आहे. आपलाच सराव सहकारी सिकंदर शेख याच्याकडून माऊलीला पराभव स्वीकारावा लागला आहे.

महाराष्ट्र केसरीच्या लालमातीच्या आखाड्यात दोन जवळचे मित्र एकमेकांना भिडले होते. माऊली जमदाडे आणि सिकंदर शेख यांची लाल मातीत झालेली लढत डोळ्यांचं पारणं फेडणारी ठरली. माऊली मूळचा अमरावतीचा आणि सिंकदर वाशीमचा आहे. पण हे दोघेही कुस्तीचे धडे कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत एकत्र गिरवत आहेत. वस्ताद विश्वास हरगुले यांचे हे दोन्ही पठ्ठे, अर्थात गुरुबंधू आहेत. या दोन्ही जिवाभावाच्या मित्रांमधील ही लढत कुस्ती स्पर्धेत पाहणं, कुस्तीप्रेमींसाठी पर्वणी होती.

आखाड्यात पाय टाकला की मित्रत्व, शत्रुत्व आणि नाती, असं सारं काही विसरून समोरचा पैलवान हा प्रतिस्पर्धी आहे, याच विचाराने पैलवान एकमेकांशी स्पर्धा करतात. माऊली आणि सिकंदरच्या लढाईतही हेच जाणवलं. कुस्तीचा तडाखेबाजपणा पाहाता ही कुस्ती मित्रांमध्येच सुरु आहे, असं कोण म्हणूही शकलं नसतं. या दोन मित्रांची लढाई इतकी रंजक आणि तोडीस तोड होऊ शकेल, ही कल्पना केवळच कुस्तीतच होऊ शकते.

माती विभागातून अतिशय चुरशीच्या लढतीत सिकंदर शेखने माऊली जामदाडेला ९-४ असे पराभूत करताना स्पर्धेत आगेकूच केली. सुरुवातीलाच सिकंदरने माऊलीवर ताबा घेत २ गुण मिळविले. माऊली जामदाडेने पहिल्याच प्रयत्नात दुहेरी पट काढताना थेट ४ गुणांची कमाई केली. त्यानंतर सिकंदर शेखने शक्ती आणि युक्तीची सांगड घालत माऊलीचा ताबा घेत पुन्हा २ गुणांची कमाई केली.

त्यानंतर माऊली जामदाडेने दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न केला, परंतु हा डाव उलटून टाकत सिकंदरने ४ गुणांची कमाई करत बाजी मारली. त्यानंतर दोघांनी देखील एकमेकांवर डाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण यात माऊली जामदाडे याला वर्तुळाच्या बाहेर ढकलत सिकंदरने विजयश्री मिळविला.

Post Views: 116
Previous Post

सर्दी-खोकल्यासाठी नका वापरू ही दोन भारतीय औषधं, WHO ने जारी केला अलर्ट…

Next Post

प्रकाश आंबेडकर- ठाकरेंसोबतची बोलणी फिस्कटली? शिंदेंच्या भेटीत काय झालं?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
प्रकाश आंबेडकर- ठाकरेंसोबतची बोलणी फिस्कटली? शिंदेंच्या भेटीत काय झालं?

प्रकाश आंबेडकर- ठाकरेंसोबतची बोलणी फिस्कटली? शिंदेंच्या भेटीत काय झालं?

ताज्या बातम्या

कचरा व्यवस्थापन, जलसंधारण, वृक्षसंवर्धनात उद्योगांची पुढाकार; सरकारी यंत्रणांकडूनही त्याच तत्परतेची अपेक्षा

कचरा व्यवस्थापन, जलसंधारण, वृक्षसंवर्धनात उद्योगांची पुढाकार; सरकारी यंत्रणांकडूनही त्याच तत्परतेची अपेक्षा

June 4, 2026
‘एम बी चॅलेंजर’ची ‘पॅंथर’वर वर मात; एन.जी. क्रिकेट अकॅडमीची स्पर्धा

‘एम बी चॅलेंजर’ची ‘पॅंथर’वर वर मात; एन.जी. क्रिकेट अकॅडमीची स्पर्धा

June 4, 2026

तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतीचा सदस्य आरक्षण सोडत कार्यक्रम ८ जून पासून सुरु

June 4, 2026
शहरात वाहतूक नियमांचे तीनतेरा  –  आधिक महिन्यामध्ये नो-पार्किंग, वॉकर झोनचेउल्लंघन. 

शहरात वाहतूक नियमांचे तीनतेरा  –  आधिक महिन्यामध्ये नो-पार्किंग, वॉकर झोनचेउल्लंघन. 

June 4, 2026

दोन ठिकाणी घरफोडी; दागिने व रोकड लंपास

June 4, 2026
सीआरएस (CRS ) पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे जन्म-मृत्यू दाखल्यांचे कामकाज ठप्प

सीआरएस (CRS ) पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे जन्म-मृत्यू दाखल्यांचे कामकाज ठप्प

June 4, 2026
कॅन्सरचे वेळेत निदानच ठरते जीवदान – सीईओ कुशल जैन 

कॅन्सरचे वेळेत निदानच ठरते जीवदान – सीईओ कुशल जैन 

June 4, 2026

ग्रंथालय कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घेतली भेट

June 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0893344

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697